आयसीसीने आज (29 जानेवारी) महिला टी20 विश्वचषक 2020चे वेळापत्रक जाहीर केले आहे. हा विश्वचषक ऑस्ट्रेलिया येथे 21 फेब्रुवारी ते 8 मार्च दरम्यान होणार आहे.
या स्पर्धेत 10 संघ सहभागी होणार असून त्यात चार वेळेचे विजेते ऑस्ट्रेलिया तसेच इंग्लंड, भारत, न्यूझीलंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, गतविजेते विंडीज आणि पात्रता फेरीतून पात्र ठरलेले दोन संघ हे या स्पर्धेत भाग घेणार आहेत.
या स्पर्धेसाठी संघांची दोन गटात विभागणी करण्यात आली आहे. यातील अ गटात भारत, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, श्रीलंका आणि पात्रता फेरीतील पहिला संघ असेल. तर ब गटात विंडीज, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, पाकिस्तान आणि पात्रता फेरीतील दुसरा संघ यांचा समावेश आहे.
या स्पर्धेचे 15 ते 20 फेब्रुवारी दरम्यान सराव सामने होणार आहेत. हे सामने एडलेड आणि ब्रिसबेन येथे खेळले जाणार आहेत. तर 21 फेब्रुवारीपासून या स्पर्धेचे मुख्य सामने सिडनी, कॅनबेरा, पर्थ आणि मेलबर्न येथे खेळले जाणार आहेत.
भारतीय संघाचा या स्पर्धेतील साखळी फेरीचा पहिलाच सामना यजमान ऑस्ट्रेलिया विरुद्ध होणार आहे. हा सामना 21 फेब्रुवारीला सिडनी येथे खेळला जाणार आहे.
त्यानंतर भारतीय संघ साखळी फेरीचा दुसरा सामना आणि तिसरा सामना अनुक्रमे 24 फेब्रुवारीला पर्थ येथे पात्रता फेरीतील पहिला संघ आणि 27 फेब्रुवारीला मेलबर्न येथे न्यूझीलंड विरुद्ध खेळणार आहे. तर चौथा सामना 29 फेब्रुवारीला श्रीलंका विरुद्ध मेलबर्न येथे खेळणार आहे.
या स्पर्धेचे उपांत्य फेरीचे सामने 5 मार्चला सिडनी येथे रंगणार आहेत. तर अंतिम सामना 8 मार्चला मेलबर्न येथे खेळला जाणार आहे.
The Women's #T20WorldCup 2020 begins on 21 February. Find out when your team plays!
FULL FIXTURES ⬇️https://t.co/7UtnUDBcC8 pic.twitter.com/Gu5TvfOBtQ
— ICC (@ICC) January 29, 2019
महत्त्वाच्या बातम्या-
–हिटमॅन रोहित शर्मा आणि मिताली राजबरोबर घडणार खास योगायोग
–कर्णधार कोहलीने ६३ वन-डेत नेतृत्व करताना केला हा मोठा पराक्रम
–टीम इंडियाकडून यशस्वी पुनरागमन केल्यानंतर हार्दिक पंड्याने मानले आभार