शुक्रवारपासून (दि. 10 फेब्रुवारी) दक्षिण आफ्रिकेत आयसीसी महिला टी20 विश्वचषक 2023 स्पर्धेला सुरुवात झाली आहे. स्पर्धेतील पहिला सामना दक्षिण आफ्रिका महिला विरुद्ध श्रीलंका महिला संघात पार पडला. यानंतर आता रविवारी (दि. 12 फेब्रुवारी) स्पर्धेतील चौथा सामना भारतीय महिला विरुद्ध पाकिस्तान महिला संघात न्यूलँड्स, केपटाऊन येथे खेळला जाणार आहे.
भारतीय संघ मागील महिन्यात महिला टी20 विश्वचषक 2023 (Womens T20 World Cup 2023) स्पर्धेच्या तयारीसाठी दक्षिण आफ्रिकेत गेला होता. यादरम्यान त्यांनी एक तिरंगी मालिकादेखील खेळली. तसेच, अंतिम सामन्यात त्यांना यजमान दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पराभवाचा सामनाही करावा लागला होता.
टी20 विश्वचषक सुरू होण्यापूर्वी भारतीय महिला संघाने 2 सराव सामनेही खेळले. यामधील पहिल्या सामन्यात त्यांना ऑस्ट्रेलियाविरुद्ध 130 धावांचा पाठिंबा करताना 44 धावांनी पराभवाचा सामना करावा लागला होता. तसेच, दुसऱ्या सराव सामन्यात भारतीय संघाने बांगलादेशविरुद्ध 52 धावांनी विजय मिळवत आत्मविश्वासात भर घालण्याचा प्रयत्न केला होता.
दुसरीकडे, पाकिस्तान महिला (Pakistan Women) संघाबद्दल बोलायचं झालं, तर त्यांनी मागील महिन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी20 मालिकेत 2-0ने पराभव पत्करला होता. तसेच, सराव सामन्यांमध्ये पाकिस्तान संघाला बांगलादेशविरुद्ध 6 विकेट्सने विजय मिळवण्यात यश आले होते, तर दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात 6 विकेट्सने पराभव पत्करावा लागला होता.
उभय संघातील आकडेवारी?
भारतीय महिला संघ आणि पाकिस्तान महिला (India Women vs Pakistan Women) संघात आतापर्यंत 13 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळले गेले आहेत. यात 10 वेळा भारतीय संघाने विजय मिळवला आहे, तर पाकिस्तान संघाला फक्त 3 सामन्यात यश मिळवता आले आहे. तसेच, मागील 5 सामन्यांबद्दल बोलायचं झालं, तर पाकिस्तान महिला संघाला फक्त 1 विजय मिळवता आला आहे. त्यांनी आशिया चषक 2022मध्ये ही कामगिरी केली होती.
खेळपट्टी आहे तरी कशी?
केपटाऊनच्या न्यूलँड्स येथे खेळल्या जाणाऱ्या या रोमांचक सामन्यातील खेळपट्टीबाबत बोलायचं झालं, तर इथे स्पर्धेतील एकच सामना खेळवण्यात आला आहे. यामध्ये यजमान दक्षिण आफ्रिका संघाला श्रीलंका संघाविरुद्ध 3 धावांनी पराभव पत्करावा लागला होता. खेळपट्टीतून फिरकीपटूंना मदत मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच, आव्हानाचा पाठलाग करणाऱ्या संघाला इथे अधिकाधिक सामन्यात विजय मिळाला आहे. (icc womens t20 world cup 2023 indw vs pakw probable playing xi pitch report read here)
दोन्ही संघांची संभावित प्लेइंग इलेव्हन
भारतीय महिला
शफाली वर्मा, जेमिमा रॉड्रिग्ज, हरलीन देओल, हरमनप्रीत कौर (कर्णधार), देविका वैद्य, पूजा वस्त्राकर, दीप्ती शर्मा, ऋचा घोष, रेणुका ठाकूर, अंजली सरवानी, शिखा पांडे.
पाकिस्तान महिला
मुबीना अली, सिदरा अमीन, बिस्माह मारूफ (कर्णधार), निदा दर, आयेशा नशीम, आलिया रियाज, ओमाइया सोहेल, कायनात इम्तियाज, फातिमा सना, तुबा हसन, नशारा संधू.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याआधी भारताला मोठा झटका, स्म्रिती मंधानाला गंभीर दुखापत
टी20 विश्वचषकात विजयी सुरुवात करण्यासाठी टीम इंडिया आतुर, पहिल्या सामन्यात पाकिस्तानचे आव्हान