आयसीसी महिला टी20 विश्वचषक 2024 आजपासून (03 ऑक्टोबर) सुरू होणार आहे. स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी दोन सामन्यांची लढत पाहायला मिळणार आहे. दुबई आणि शारजाह येथे खेळल्या जाणाऱ्या महिला टी20 विश्वचषक 2024 च्या पहिल्या दिवशी आज (03 ऑक्टोबर) दोन सामने पाहायला मिळतील. स्पर्धेतील पहिला सामना बांग्लादेश आणि स्कॉटलंडच्या संघांमध्ये होणार आहे. तर दुसरा सामना पाकिस्तान आणि श्रीलंकेच्या संघांमध्ये होणार आहे.
बांग्लादेश आणि स्कॉटलंड यांच्यातील सामना शारजाहमध्ये भारतीय वेळेनुसार दुपारी 3.30 वाजता होणार आहे. त्यानंतर पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यातील दुसरा सामना शारजाहमध्ये संध्याकाळी 7.30 वाजता खेळवला जाईल. टीम इंडियाचा या स्पर्धेतील पहिला सामना शुक्रवार, 4 ऑक्टोबर रोजी पाहायला मिळणार आहे. टीम इंडियाचा पहिला सामना न्यूझीलंडशी होणार आहे. तर शेवटचा साखळी फेरीतील सामना 13 ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलिया विरुद्ध होईल.
आजपासून सुरू होत असलेल्या महिला टी20 विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना रविवार, 20 ऑक्टोबर रोजी होईल. येत्या 18 दिवसांत एकूण 23 सामने पाहायला मिळतील. याआधी ही स्पर्धा बांग्लादेशमध्ये होणार होती, पण तिथली परिस्थिती लक्षात घेऊन आयसीसीने ती तिथून हलवण्याचा निर्णय घेतला. या स्पर्धेची ही 9वी आवृत्ती आहे.
या स्पर्धेत एकूण 10 संघ सहभागी होत असून त्यांची दोन गटात विभागणी करण्यात आली आहे. ऑस्ट्रेलिया, भारत, न्यूझीलंड, पाकिस्तान आणि श्रीलंका यांना ‘अ’ गटात ठेवण्यात आले आहे. तर बांग्लादेश, इंग्लंड, स्कॉटलंड, दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज यांना ‘ब’ गटात ठेवण्यात आले आहे.
या स्पर्धेसाठी बांगलादेश संघ
निगार सुलताना जोती (कर्णधार), नाहिदा अख्तर, मुर्शिदा खातून, शोरना अख्तर, रितू मोनी, शोभना मोस्तारी, राबेया, सुलताना खातून, फहिमा खातून, मारुफा अख्तर, जहाँआरा आलम, दिलारा अख्तर, ताज नेहार, शती राणी, दिशा बिस्वा.
स्पर्धेसाठी स्कॉटलंडचा संघ
कॅथरीन ब्राइस (कर्णधार), सारा ब्राइस (उप-कर्णधार), लॉर्ना जॅक-ब्राऊन, ॲबे एटकेन-ड्रमंड, अबटा मकसूद, सास्किया हॉर्ले, क्लो एबेल, प्रियनाझ चॅटर्जी, मेगन मॅकॉल, डार्सी कार्टर, आयल्सा लिस्टर, हन्ना रेनी, रेचेल स्ला , कॅथरीन फ्रेझर, ऑलिव्हिया बेल.
या स्पर्धेसाठी पाकिस्तान संघ
फातिमा सना (कर्णधार), आलिया रियाझ, डायना बेग, गुल फिरोज, इरम जावेद, मुनिबा अली, नशरा सुंधू, निदा दार, ओमामा सोहेल, सदफ शमास, सादिया इक्बाल (फिटनेसच्या अधीन), सिद्रा अमीन, सय्यदा अरुब शाह, तस्मिया रुबाब , तुबा हसन.
या स्पर्धेसाठी श्रीलंकेचा संघ
चमारी अथापथु (कर्णधार), अनुष्का संजीवनी, हर्षिता माधवी, नीलाक्षिका डी सिल्वा, इनोका रणवीरा, हसिनी परेरा, कविशा दिलहरी, सचिनी निसानसाला, विश्मी गुणरत्ने, उदेशिका प्रबोधनी, अचिनी कुलसूरिया, सुगंधिका प्रबोधनी, गगनशिका कुमारी, इंचनी कुमारी, अचिनी कुलसूरिया, गौतम कुमारी
भारतीय चाहते स्टार स्पोर्ट्सच्या विविध नेटवर्कवर टीव्हीवर महिला टी20 विश्वचषक 2024 च्या सर्व सामन्यांचा आनंद घेऊ शकतात. तर डिस्ने प्लस हॉटस्टारवर देखील महिला टी20 विश्वचषक सामन्यांचे थेट प्रक्षेपण पाहता येईल.
हेही वाचा-
रोहित शर्मा की एमएस धोनी, भारताचा सर्वोत्तम कर्णधार कोण? हरभजन सिंग म्हणाला…
‘या’ 26 वर्षीय खेळाडूला आयसीसीने 1 वर्षासाठी केलं बॅन!
SA20 Auction; दक्षिण आफ्रिकेचा स्टार सलामीवीर ठरला सर्वात महागडा खेळाडू