येत्या 10 फेब्रुवारीपासून आयसीसी महिला टी20 विश्वचषक 2023 स्पर्धेला सुरुवात होणार आहे. या स्पर्धेला सुरुवात होण्यापूर्वी सोमवारी (दि. 6 फेब्रुवारी) सराव सामने खेळवले गेले. यातील चौथा सामना भारतीय महिला विरुद्ध ऑस्ट्रेलिया महिला संघात पार पडला. केपटाऊन येथील न्यूलँड्स मैदानावर पार पडलेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतीय संघाला 44 धावांनी पराभूत केले.
या सामन्यात ऑस्ट्रेलिया महिला (Australia Women) संघाने नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला होता. यावेळी ऑस्ट्रेलियाने पहिल्यांदा फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकात 8 विकेट्स गमावत 129 धावा चोपल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय महिला (India Women) संघाचा डाव 15 षटकात 85 धावांवरच संपुष्टात आला.
The teams are warming up nicely ahead of the ICC Women’s #T20WorldCup
Monday afternoon saw wins for:
🔹 England
🔹 Australia
🔹 And Pakistan➡️ https://t.co/jX47VOZ8In pic.twitter.com/ivBUHsoOyl
— T20 World Cup (@T20WorldCup) February 6, 2023
भारताकडून फलंदाजी करताना दीप्ती शर्मा हिने सर्वाधिक धावा केल्या. तिने यावेळी 22 चेंडूत 3 चौकारांच्या मदतीने 19 धावा कुटल्या. तिच्याव्यतिरिक्त हरलीन देओल हिनेदेखील 12 धावांचे योगदान दिले. तसेच, अंजली सर्वनी हिनेही 11 धावा करत संघाच्या धावसंख्येत वाढ केली. या तिघींव्यतिरिक्त एकही फलंदाज 10 धावांचा आकडा पार करू शकली नाही. जेमिमाह रोड्रिग्ज आणि स्म्रीती मंधाना (Smriti Mandhana) या दोघीही चक्क शून्य धावेवर बाद झाल्या.
यावेळी ऑस्ट्रेलियाकडून गोलंदाजी करताना डार्सी ब्राऊन हिने सर्वाधिक विकेट्स घेतल्या. डार्सीने 3 षटकात 17 धावा खर्च करत 4 विकेट्स चटकावल्या. तिच्याव्यतिरिक्त ऍशले गार्डनर हिने 2, तर किम गार्थ आणि जेस जोनासन यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.
ऑस्ट्रेलियाचा डाव
तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलिया संघाकडून जॉर्जिया वेअरहॅम हिने सर्वाधिक धावा केल्या. तिने 17 चेंडूत नाबाद 32 धावा केल्या. यामध्ये 1 चौकार आणि 3 षटकारांचाही समावेश होता. तसेच, बेथ मूनी हिनेदेखील 28 धावा केल्या. तिच्याव्यतिरिक्त जेस जोनासन आणि ऍशले गार्डनर यांनी प्रत्येकी 22 धावांचे योगदान दिले. यावेळी कर्णधार मेग लॅनिंग हिला एकही धाव काढता आली नाही. ती शून्यावर तंबूत परतली. याव्यतिरिक्त एकही फलंदाज 10 धावांचा आकडा पार करू शकली नाही.
यावेळी भारतीय संघाकडून गोलंदाजी करताना शिखा पांडे, पूजा वस्त्राकर आणि राधा यादव यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. तसेच, राजेश्वरी गायकवाड हिनेदेखील एक विकेट खिशात घातली.
भारतीय संघाचा स्पर्धेतील पुढील सराव सामना 8 फेब्रुवारी रोजी बांगलादेशविरुद्ध पार पडेल. खरं तर, हा सराव सामना भारतीय महिला क्रिकेट संघाच्या तयारीसाठी खूपच महत्त्वाचा असणार आहे. या सराव सामन्यात विजय मिळवत भारतीय संघ मजबूत इराद्याने विश्वचषकात खेळण्यासाठी उतरेल.
महिला टी20 विश्वचषक 2023 (Womens T20 World Cup 2023) स्पर्धेतील पहिला सामना 12 फेब्रुवारी रोजी कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध होईल. (icc womens t20 world cup indian women cricket team preparations exposed australia defeated read here)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘मी कोण आहे, हे त्यांना दाखवून देईल…’, देशांतर्गत क्रिकेटमध्ये धावांचा पाऊस पाडणाऱ्या सरफराजचे भाष्य
बॉर्डर-गावसकर ट्रॉफीपूर्वीच संजू सॅमसनचं नशीब फळफळलं! थेट ‘या’ संघाने सोपवली मोठी जबाबदारी