---Advertisement---

WOMEN’S WORLD CUP: ऑस्ट्रेलिया सेमीफायनलमध्ये दाखल, भारतासाठी पुढील सामने निर्णायक

On: शुक्रवार, ऑक्टोबर 17, 2025 7:30 AM
---Advertisement---

ICC महिला क्रिकेट विश्वचषक 2025 मध्ये ऑस्ट्रेलियाने जबरदस्त कामगिरी करत सर्वप्रथम सेमीफायनलमध्ये आपले स्थान निश्चित केले आहे. आतापर्यंत खेळलेल्या पाच सामन्यांपैकी चार सामने जिंकत आणि एक सामना अनिर्णित राहिल्याने ऑस्ट्रेलियाच्या खात्यात 9 गुण जमा झाले आहेत. त्यामुळे त्यांनी स्पर्धेतील अंतिम चारमध्ये आपली जागा निश्चित केली आहे.

दुसरीकडे, इतर संघांसाठी मात्र सेमीफायनलचे गणित आता अधिक गुंतागुंतीचे बनले आहे. इंग्लंडचा संघ 4 पैकी 3 सामने जिंकून आणि एक सामना अर्निणीत ठरल्याने 7 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. दक्षिण आफ्रिकेने देखील 3 सामने जिंकले असून 6 गुणांसह ती तिसऱ्या स्थानी आहे.

भारतीय संघ सध्या 4 गुणांसह चौथ्या स्थानावर असून, त्यांना उर्वरित सामने जिंकणे आवश्यक आहे. भारताच्या रन रेटचा तुलनेत फायदा असला तरी पराभव परवडणारा नाही.

गुणतालिका (17 ऑक्टोबर 2025 पर्यंत):

स्थानसंघसामनेविजयपराभवनिष्फळगुणनेट रन रेट
1ऑस्ट्रेलिया (Q)54019+1.818
2इंग्लंड43017+1.864
3दक्षिण आफ्रिका43106-0.618
4भारत42204+0.682
5न्यूझीलंड41213-0.245
6बांगलादेश51402-0.676
7श्रीलंका40222-1.526
8पाकिस्तान40311-1.88

बांगलादेशने पाचपैकी फक्त एकच सामना जिंकला आहे. आता एका पराभवाने त्यांचा सेमीफायनलचा मार्ग पूर्णपणे बंद होईल. पावसामुळे सामना रद्द झाल्यासही त्यांचे स्वप्न अधुरे राहील.

श्रीलंका आणि पाकिस्तानसाठी स्थिती आणखी कठीण आहे. श्रीलंकेच्या खात्यात 2 तर पाकिस्तानकडे फक्त 1 गुण आहे. दोघांचाही विजयाचा आकडा अद्याप उघडलेला नाही. श्रीलंकेला अजून तीन सामने बाकी असले तरी एक पराभवही त्यांच्यासाठी अडचणीत आणू शकतो.

भारत, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यासह न्यूझीलंडसुद्धा सेमीफायनलच्या रेसमध्ये आहे, मात्र त्यांच्यासाठी प्रत्येक सामना ‘करो या मरो’ ठरणार आहे. ऑस्ट्रेलियाचा संघ मात्र निर्धास्त असून, आता ते फक्त गुणतालिकेतील आघाडी मजबूत करण्याकडे लक्ष देतील.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---