आयसीसी महिला वनडे विश्वचषकातील २५वा सामना ऑस्ट्रेलिया विरुद्ध बांगलादेश संघात झाला. वेलिंग्टनच्या बेसिन रिझर्व स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात अनोखाच प्रकार पाहायला मिळाला. या सामन्यात यष्टींवर नेहमीप्रमाणे बेल्स ठेवल्या गेल्या नव्हत्या. क्रिकेट सामन्यातील या दुर्मिळ पाहायला मिळण्यामागचे गोष्टीमागचे कारण आहे?
तर ऑस्ट्रेलिया आणि बांगलादेश (AUSW vs BANW) संघातील सामना सुरू होण्यापूर्वी वेलिंग्टनमध्ये (Wellington) खूप जोरदार हवा वाहत होती. तसेच थोडाफार पाऊसही पडला होता. त्यामुळे सामना सुरू होण्यासही उशीर झाला होता. परिणामी दोन्ही संघांमध्ये केवळ ४३-४३ षटकांचा सामना खेळवण्यात आला होता.
या सामन्यातील पहिले षटक टाकण्यासाठी ऑस्ट्रेलियाची मेगन शट आली होती. तर बांगलादेशकडून मुरशिदा खातून आणि शरमिन अख्तर फलंदाजी करत होत्या. मात्र पहिल्याच षटकादरम्यान मेगन शटने चेंडू टाकण्यापूर्वीच यष्टीवरील बेल्स उडून खाली पडल्या होत्या. वाऱ्याच्या वेगामुळे बेल्स पुन्हा पुन्हा खाली पडत होत्या. त्यामुळे बेल्सविना सामना खेळवला (Match Without Bails On Stumps) जाण्याचा निर्णय घेतला होता.
https://www.instagram.com/reel/CbgZpk2F2tp/?utm_source=ig_web_copy_link
आयसीसीने या सामन्यादरम्यानचे काही व्हिडिओ शेअर केले आहेत, ज्यामध्ये यष्ट्यांवर बेल्स नसल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. तसेच वेलिंग्टनमध्ये इतकी जोराची हवा वाहत होती की, खेळाडूही सामन्यादरम्यान थंडीने थरथरताना दिसलेल्या.
Windy and cold down at Basin Reserve 🥶#CWC22 pic.twitter.com/Eq70V5JoQx
— ICC Cricket World Cup (@cricketworldcup) March 25, 2022
https://www.instagram.com/reel/Cbg0FfGlyHe/?utm_source=ig_web_copy_link
https://www.instagram.com/reel/CbgsbeHlpiX/?utm_source=ig_web_copy_link
https://www.instagram.com/reel/CbggDe9lhTS/?utm_source=ig_web_copy_link
दरम्यान या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी निवडल्याने बांगलादेशचा संघ पहिल्यांदा फलंदाजीसाठी मैदानावर उतरला. प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशने ४३ षटकांमध्ये ६ विकेट्सच्या नुकसानावर १३५ धावा केल्या. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाच्या संघाने ३३ षटकांमध्ये ५ विकेट्स गमावत बांगलादेशचे लक्ष्य सहज पूर्ण केले आणि ५ विकेट्स राखून सामनाही (AUSW Beat BANW) जिंकला.
प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशकडून एकाही फलंदाजांला मोठ्या खेळी करता आल्या नाहीत. खालच्या फळीत लता मंडळने सर्वाधिक ३३ धावा केल्या. परिणामी बांगलादेशने १३५ धावा फलकावर लावल्या. या डावात ऑस्ट्रेलियाकडून ऍश्ले गार्डनर आणि जेस जोनासन यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या.
बांगलादेशच्या १३६ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाकडून कर्णधार बेथ मूनी हिने चिवट झुंज दिली. इतर फलंदाज सपशेल फोल ठरत असताना तिने ७५ चेंडूंमध्ये नाबाद ६६ धावा फटकावल्या. या शानदार खेळीदरम्यान तिने ५ चौकारही मारले. तसेच ऍनाबेल सदरलँडने शेवटच्या षटकात नाबाद राहात २६ धावांची खेळी केली. या खेळींमुळे ऑस्ट्रेलियाने ३२.१ षटकातच बांगलादेशचे लक्ष्य पूर्ण केले आणि सामनाही जिंकला.
महत्त्वाच्या बातम्या-
माजी कर्णधार धोनीला फाफ डू प्लेसिसचा सलाम; म्हणाला, ‘मी भाग्यवान होतो, त्याला जवळून पाहू शकलो’
IPL 2022 : चेन्नई आणि कोलकाता संघांमध्ये रंगणार उद्घाटन सामना, अशी असेल संभाव्य प्लेइंग इलेव्हन