न्यूझीलंडमध्ये सध्या महिला विश्वचषक २०२२ स्पर्धा खेळवली जात आहे. या सामन्यात भारतीय महिला संघ मिताली राजच्या नेतृत्त्वाखाली खेळत आहे. भारतीय महिला संघाचा या विश्वचषकातील साखळी फेरीचा पाचवा सामना बलाढ्य ऑस्ट्रेलियाशी शनिवारी (१९ मार्च) होणार आहे. या स्पर्धेतील हा १८ वा सामना असणार आहे.
भारतीय संघासाठी ऑस्ट्रेलियाचा कठीण पेपर
यंदाचा विश्वचषकात आत्तापर्यंत ऑस्ट्रेलियाच्या महिला संघाचा दबदबा पाहायला मिळाला आहे. त्यांनी आत्तापर्यंत झालेले चारही साखळी सामने जिंकले आहेत. त्यामुळे भारतासाठी त्यांचे आव्हान सोपे असणार नाही. तसेच भारतीय संघासाठी उपांत्य फेरीसाठीच्या दृष्टीने हा सामना महत्त्वाचा आहे. कारण भारताला या विश्वचषकात आत्तापर्यंत संमिश्र यश मिळाले आहे. भारतीय संघाने २ सामने जिंकले आहेत, तर २ पराभूत झाले आहेत. त्यामुळे आता स्पर्धेतील सुकर प्रवासासाठी भारताला ऑस्ट्रेलियाला पराभवाचा धक्का द्यावा लागणार आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या या सामन्याआधी भारतासाठी आनंदाची बातमी अशी की, उपकर्णधार हरमनप्रीत या सामन्यासाठी तंदुरुस्त असून निवडीसाठी उपलब्ध असणार आहे.
आमने-सामने इतिहास
दरम्यान, २०१७ नंतर पहिल्यांदाच महिला वनडे विश्वचषकात (ICC Women’s World Cup) भारत आणि ऑस्ट्रेलिया आमने-सामने येत आहेत. २०१७ च्या महिला विश्वचषकात भारताने ऑस्ट्रेलियाला उपांत्य फेरीत पराभूत केले होते.
तसेच आत्तापर्यंत भारतीय महिला विरुद्ध ऑस्ट्रेलिया महिला संघात ४९ वनडे सामने खेळवले गेले आहेत. यातील भारतीय महिला संघाला केवळ १० सामने जिंकण्यात यश आले आहेत, तर ३९ सामने ऑस्ट्रेलिया महिला संघाने जिंकले आहेत.
विश्वचषकातील भारतीय महिला विरुद्ध ऑस्ट्रेलिया महिला (India vs Australia) सामन्याबद्दल जाणून घ्या सर्वकाही…
१. महिला विश्वचषकातील भारतीय महिला विरुद्ध ऑस्ट्रेलिया महिला सामना केव्हा होणार?
– महिला विश्वचषकातील भारतीय महिला विरुद्ध ऑस्ट्रेलिया महिला सामना १९ मार्च २०२२ रोजी खेळला जाणार आहे.
२. महिला विश्वचषकातील भारतीय महिला विरुद्ध ऑस्ट्रेलिया महिला सामना कुठे खेळवला जाणार?
– महिला विश्वचषकातील भारतीय महिला विरुद्ध ऑस्ट्रेलिया महिला सामना इडन पार्क, ऑकलंड येथे खेळवला जाईल.
३. महिला विश्वचषकातील भारतीय महिला विरुद्ध ऑस्ट्रेलिया महिला सामना किती वाजता सुरु होणार?
– महिला विश्वचषकातील भारतीय महिला विरुद्ध ऑस्ट्रेलिया महिला सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी ६.३० वाजता सुरु होईल. त्याआधी सकाळी ६.०० वाजता नाणेफेक होईल.
४. महिला विश्वचषकातील भारतीय महिला विरुद्ध ऑस्ट्रेलिया महिला सामन्याचे थेट प्रक्षेपण भारतात कोणत्या चॅनेलवर पाहाता येईल?
– महिला विश्वचषकातील भारतीय महिला विरुद्ध ऑस्ट्रेलिया महिला सामन्याचे थेट प्रक्षेपण भारतात स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या चॅनेलवर पाहता येईल.
५. महिला विश्वचषकातील भारतीय महिला विरुद्ध ऑस्ट्रेलिया महिला सामन्याचे थेट प्रक्षेपण ऑनलाईन कसे पाहाता येईल?
– महिला विश्वचषकातील भारतीय महिला विरुद्ध ऑस्ट्रेलिया महिला सामन्याचे ऑनलाईन थेट प्रक्षेपण डिज्नी प्लस हॉटस्टार या ऍपवर पाहाता येईल.
यातून निवडला जाईल ११ जणांचा संघ –
भारतीय महिला – स्म्रीती मंधना, यस्तिका भाटिया, मिताली राज (कर्णधार), दीप्ती शर्मा, हरमनप्रीत कौर, स्नेह राणा, रिचा घोष (यष्टीरक्षक), पूजा वस्त्राकार, झुलन गोस्वामी, मेघना सिंग, राजेश्वरी गायकवाड, पूनम यादव, तानिया भाटिया, रेणुका सिंग, शेफाली वर्मा
ऑस्ट्रेलिया महिला – एलिसा हिली(यष्टीरक्षक), रॅचेल हेन्स, मेग लॅनिंग(कर्णधार), एलिसा पेरी, बेथ मूनी, ताहलिया मॅकग्रा, ऍशले गार्डनर, ऍनाबेल सदरलँड, जेस जोनासेन, ऍलना किंग, मेगन शट, ग्रेस हॅरिस, निकोला केरी, अमांडा वेलिंग्टन, डार्सी ब्राउन
महत्त्वाच्या बातम्या –
बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात वेस्ट इंडिजची खेळाडू मैदानावरच कोसळली; तातडीने हलवले रुग्णालयात
‘काही नवे, तर काही जुने’, सनरायझर्स संघात तीन महत्त्वाच्या सदस्यांचं झालं जंगी स्वागत
असे ३ फलंदाज, ज्यांनी आयपीएलमध्ये घातक वेगवान गोलंदाज बुमराहची केलीय धू धू धुलाई