आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने आज, 25 जूनला आयसीसी महिला टी20 विश्वचषक 2018 चे वेळापत्रक जाहिर केले आहे. हा विश्वचषक विंडिजमध्ये 9 ते 24 नोव्हेंबर दरम्यान होणार आहे.
या स्पर्धेत 10 संघ सहभागी होणार असुन त्यात तीनवेळचे विजेते आॅस्ट्रेलिया तसेच इंग्लंड, भारत, न्यूझीलंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, गतविजेते विंडीज आणि पात्रता फेरीतून पात्र ठरलेले दोन संघ हे या स्पर्धेत भाग घेणार आहे.
या स्पर्धेसाठी संघांची दोन गटात विभागणी करण्यात आली आहे. यातील अ गटात इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, विंडीज, आणि पात्रता फेरीतील पहिला संघ असतील. तर ब गटात भारत, पाकिस्तान या पारंपारिक प्रतिस्पर्ध्यांसह आॅस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि पात्रता फेरीतील दुसरा संघ यांचा समावेश आहे.
या स्पर्धेची 9 नोव्हेंबरला भारत विरुद्ध न्यूझीलंड सामन्याने सुरवात होणार आहे. हा सामना गयाना नॅशनल स्टेडियमवर होणार आहे.
त्यानंतर भारतीय संघ साखळी फेरीत 11 नोव्हेंबरला पाकिस्तानविरुद्ध खेळेल. तसेच साखळी फेरीत भारत अनुक्रमे 15 आणि 17 नोव्हेंबरला पात्रता फेरीतील दुसरा संघ आणि आॅस्ट्रेलिया विरुद्ध खेळणार आहे.
या विश्वचषकाची पात्रता फेरी 7 ते 14 जुलै दरम्यान नेदरलँड्समध्ये पार पडणार आहे. यातील अंतिम सामन्यात जाणारे दोन संघ मुख्य स्पर्धेला पात्र ठरणार आहेत. विश्वचषकाच्या पात्रता फेरीमध्ये आशियाई चषक विजेते बांग्लादेश, आयर्लंड, नेदरलॅंड्स, पापुआ न्यू गिनी, स्कॉटलंड, थायलंड, युगांडा आणि संयुक्त अरब अमिराती हे संघ सहभागी होणार आहेत.
नोव्हेंबर महिन्यात पार पडणाऱ्या महिला टी20 विश्वचषकात एकूण 23 सामने होणार असुन यावेळी पहिल्यांदाच टी20 विश्वचषकात डिसीजन रिव्यू सिस्टम (डिआरएस) चा वापर होणार आहे.
तसेच महिलांच्या क्रिकेटकडे लक्ष वेधण्यासाठी या सामन्यांचे लाईव्ह प्रसारणही करण्यात येणार आहे.
ही स्पर्धा गयाना नॅशनल स्टेडियम, सेंट लुसिया मधील डॅरेन सॅमी क्रिकेट स्टेडियम आणि अँटिगामधील सर विवियन रिचर्ड्स क्रिकेट ग्राऊंड अशा 3 स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे.
अँटिगामधील सर विवियन रिचर्ड्स क्रिकेट ग्राऊंडवर 22 नोव्हेंबरला होणारे दोन्ही उपांत्य फेरीतील सामने आणि 24 नोव्हेंबरला होणारा अंतिम सामना पार पडेल.
Every single match of this first stand-alone Women's World T20 will be broadcast LIVE from Guyana, St Lucia and Antigua and Barbuda with DRS to be used in an ICC World T20 event for the first time 🙌 #WT20 pic.twitter.com/MTKM7vzyT1
— ICC (@ICC) June 25, 2018
महत्त्वाच्या बातम्या:
–Video: शिखर धवन म्हणतो कोहली-धोनी मेरे दो अनमोल रतन, एक है राम तो दूजा लखन
–हा खेळाडू म्हणतो….धोनीपेक्षा जोश बटलर लई भारी!
–रोनाल्डो-मेस्सी वादात आता कोहलीची ‘विराट’ उडी; ह्या खेळाडूला म्हटले महान!