आजपासून(30 मे) आयसीसीच्या 12 व्या विश्वचषकाला इंग्लंडमध्ये सुरुवात होत आहे. त्यामुळे या विश्वचषकाचा भव्य उद्धाटन सोहळा काल(29 मे) रात्री लंडन येथे पार पडला. या उद्घाटन सोहळ्यात माजी क्रिकेटपटू आणि विविध क्षेत्रातील सेलिब्रेंटीसह अनोखे 60 सेकंड्स चॅलेंजही घेण्यात आले.
या उद्धाटन सोहळ्याचे निवेदन इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू ऍन्ड्र्यू फ्लिंटॉफसह शिवानी दांडेकर आणि पॅडी मॅकगिनेसने केले. यावेळी सर्व संघाचे कर्णधारही उपस्थित होते.
या सोहळ्यादरम्यान भारताचा कर्णधार विराट कोहली म्हणाला, ‘इथे खूप छान वाटत आहे. इकडे मोठा चाहतावर्ग आहे. त्यामुळे हा एकप्रकारचा दबाव आणि अभिमानही आहे. आम्हाला या प्रेक्षकांच्या पाठिंब्याचा फायदा होईल.’
या उद्घाटनाच्या सुरुवातीला इंग्लंडचे गायक जॉन न्यूमनने ‘फिल द लव्ह’ हे गाणे सादर केले. त्यानंतर 60 सेंकड चॅलेंजला सुरुवात झाली.
या 60 सेंकड चॅलेंजमध्ये विश्वचषकातील सर्व सहभागी देशांचे प्रत्येकी 2 पाहुण्या सदस्यांनी प्रतिनिधित्व केले. यामध्ये ज्या संघाने 60 सेंकडमध्ये(1 मिनीट) सर्वाधिक धावा केल्या तो संघ या चॅलेंजचा विजेता ठरला. या चॅलेंजसाठी ऑस्ट्रेलियाचे डेव्हिड बून हे पंच होते.
भारताचे प्रतिनिधित्व माजी कर्णधार अनिल कुंबळे आणि बॉलिवूड अभिनेता फरहान अख्तरने केले. तसेच या चॅलेंजमध्ये विव रिचर्ड्स, जॅक कॅलिस, ब्रेट ली, केविन पिटरसन, माहेला जयवर्धने असे दिग्गज सामील झाले होते.
या चॅलेंजची सुरुवात अफगाणिस्तानने केली. अफगाणिस्तानचे प्रतिनिधित्व मिरवेज अश्रफ आणि अरिआना सईद यांनी केले. त्यांनी 52 धावा केल्या. त्यानंतर श्रीलंकेने 43 धावा केल्या. त्यांच्याकडून जयवर्धने सामील झाला होता.
तसेच वेस्ट इंडिजचे प्रतिनिधित्व महान फलंदाज विव रिचर्ड्स आणि ऑलिंपिक ऍथलिट योहान ब्लॅक यांनी केले. या दोघांनी मिळून 47 धावा केल्या. तर बांगलादेशकडून अब्दुर रझाक आणि जया आशा यांनी 22 धावा केल्या.
यानंतर पाकिस्तानकडून नोबेल पारितोषिक विजेती मलाला युसुफजाई आणि अझर अली यांनी 38 धावा केल्या. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाकडून दिग्गज माजी वेगवान गोलंदाज ब्रेट ली आणि पॅट कॅशने तब्बल 69 धावा केल्या. तर न्यूझीलंडचे प्रतिनिधित्व करताना माजी क्रिकेटपटू जेम्स फ्रॅकलिन आणि माजी रग्बी खेळाडू सीन फिट्सपॅट्रीकला 32 धावाच करता आल्या.
दक्षिण आफ्रिकेकडून महान अष्टपैलू खेळाडू जॅक कॅलिस आणि फुटबॉलपटू स्टिव्ह पिनारने 48 धावांची धावसंख्या उभी केली. यानंतर भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या कुंबळे आणि फरहानला मात्र 19 धावाच करता आल्या. या चॅलेंजमधील ही सर्वात कमी धावसंख्या ठरली.
शेवटी इंग्लंडकडून माजी दिग्गज फलंदाज केविन पिटरसन आणि ख्रिस ह्यूजने या चॅलेंजमधील सर्वाधिक धावा केल्या. त्यांनी 74 धावा करत या चॅलेंजचे विजेतेपदही मिळवले.
या उद्घाटन सोहळ्यात 60 सेंकड चॅलेंजनंतर ऑस्ट्रेलिया माजी कर्णधार मायकल क्लार्क आणि इंग्लंडचा माजी दिग्गज गोलंदाज ग्रॅमी स्वान यांनी विश्वचषकाची ट्रॉफी स्टेजवर आणली. त्यानंतर अखेर स्टँड बाय हे विश्वचषकाचे थिम साँग गायक लॉरेल आणि रडिमेंटल यांनी सादर केले.
त्याचबरोबर यावेळी विश्वचषकातील सर्व सहभागी संघाच्या कर्णधारांनी बकिंगहॅम पॅलेस येथे इंग्लंडची महाराणी एलिझाबेथ यांचीही भेट घेतली होती.
या विश्वचषकातील पहिला सामना इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात आज(30 मे) द ओव्हल मैदानावर रंगणार आहे.
The captains from all ten #CWC19 sides met Queen Elizabeth II & the Duke of Sussex at Buckingham Palace earlier today. pic.twitter.com/ejorQW1dvN
— ICC Cricket World Cup (@cricketworldcup) May 29, 2019
What a way to open #CWC19! ???? pic.twitter.com/6dAcjwAxYn
— ICC Cricket World Cup (@cricketworldcup) May 29, 2019
Look who's arrived at the #CWC19 Opening Party ???? pic.twitter.com/QJAoUEWVfl
— ICC Cricket World Cup (@cricketworldcup) May 29, 2019
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–Video: टीम इंडियातील हा खेळाडू आहे सर्वात वाईट डान्सर, जडेजाने केले गमतीशीर खूलासे
–बोट आहे फ्रॅक्चर तरीही इंग्लंडच्या कर्णधाराने पूर्ण केले हे चॅलेंज, पहा व्हिडिओ
–बुमराहच्या सुरेख यॉर्करवर बांगलादेशचा अष्टपैलू खेळाडू झाला क्लीन बोल्ड, पहा व्हिडिओ






