आयसीसी वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेत अफगाणिस्तान संघाने आतापर्यंत शानदार कामगिरी केली आहे. हशमतुल्लाह शाहिदी याच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तान संघाने तीन माजी विश्वविजेत्या संघांना पराभवाचा धक्का दिला आहे. यापूर्वी अफगाणिस्तानने विश्वचषकात फक्त एक सामना जिंकला होता. मात्र, विश्वचषक 2023 स्पर्धेत त्यांनी आतापर्यंत 3 सामने जिंकले आहेत. तसेच, उपांत्य फेरीच्या शर्यतीतही स्वत:ला कायम ठेवले आहे. अशात या संघाच्या यशामागील एक गुपीत समोर आले आहे. स्वत: आयसीसीनेही याची दखल घेतली आहे.
खरं तर, अफगाणिस्तान संघाच्या ड्रेसिंग रूममध्ये सामन्यादरम्यान नेहमीच व्हाइड बोर्ड (White Board) आणि त्यावर काही नंबर लिहिलेले दिसतात. आता यामागील सत्यही समोर आले आहे की, यावर नक्की काय लिहिलेलं असतं? श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात अफगाणिस्तान संघाचे प्रशिक्षक जोनाथन ट्रॉट (Jonathan Trott) यांचे विधानही समोर आले आहे. त्यांनी म्हटले आहे की, “संघात प्रतिभेचा भडीमार आहे. फक्त त्यांना रणनीती आणि सामन्यातील योजनेची गरज आहे.”
व्हाइट बोर्डाचे रहस्य आहे तरी?
अफगाणिस्तान संघाच्या सामन्यादरम्यान स्क्रीनवर अनेकदा एक व्हाइट बोर्ड पाहायला मिळाला. यावर काही आकडे लिहिले होते. आता आयसीसीने शेअर केलेल्या प्रशिक्षक आणि कर्णधारांच्या रिपोर्टमध्ये याबाबत माहिती दिली आहे. यामध्ये समजले आहे की, या बोर्डवर संघासाठी प्रत्येक 10 षटकांचे लक्ष्य लिहिले जाते. जसे की, 10 षटकात 50 धावा, 20 षटकात 100 धावा अशाप्रकारे योजना तयार असते. प्रशिक्षक आणि कर्णधारांनी म्हटले की, “अशाप्रकारे जेव्हा आम्ही लक्ष्याचा पाठलाग करतो, तेव्हा मदत मिळते.”
या योजनेविषयी बोलताना ट्रॉट म्हणाले की, “जेव्हा संघ प्रथम फलंदाजी करतो, तेव्हा त्यावेळी योजना वेगळी असते. त्यावेळी आमची रणनीती संवादावर अवलंबून असते. त्यावेळी लक्ष्य बदलत असतात. जोपर्यंत डकवर्थ लुईस नियम येत नाही, तोपर्यंत आव्हानाचा पाठलाग करताना असे नसते. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याचे उदाहरण घेऊयात, जेव्हा 280 धावांचे लक्ष्य तुम्ही विभाजित करता, तेव्हा हे मिळवणे खूपच सोपे होते.”
Afghanistan coach Jonathan Trott explains his use of a whiteboard during his side's emphatic #CWC23 triumph over Sri Lanka 👀
Details 👉 https://t.co/bQ3xdhX59m pic.twitter.com/fgydklkBaQ
— ICC (@ICC) October 31, 2023
अफगाणिस्तानचा दणदणीत विजय
स्पर्धेच्या 30व्या सामन्यात श्रीलंका संघाने प्रथम फलंदाजी करताना 49.3 षटकात 241 धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना अफगाणिस्तानने 45.2 षटकात 3 विकेट्स गमावत 242 धावा केल्या. तसेच, सामना 7 विकेट्सने सामना खिशात घातला. आता अफगाणिस्तानचा पुढील सामना नेदरलँड्सविरुद्ध 3 नोव्हेंबर रोजी लखनऊ येथे खेळला जाणार आहे. (icc world cup 2023 afghanistan cricket team whiteboard strategy success story coach jonathan trott)
हेही वाचा-
भारताच्या माजी खेळाडूने गायले शाहीन आफ्रिदीचे गुणगान, इतर गोलंदाजांविषयी म्हणाला…
‘असे’ 5 खेळाडू, ज्यांच्याकडून वर्ल्डकपमध्ये कुणालाच नव्हती अपेक्षा, पण आपल्या प्रदर्शनाने करतायेत धमाल