वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेतील 30वा सामना सोमवारी (दि. 30 ऑक्टोबर) पुण्याच्या एमसीए स्टेडिअमवर पार पडला. या सामन्यात अफगाणिस्तान संघाने 7 विकेट्सने विजय मिळवला. मात्र, या सामन्याला सुरुवात होण्यापूर्वी मैदानावर धक्कादायक घटना घडली. जेव्हा दोन्ही देशांचे खेळाडू राष्ट्रगीतासाठी मैदानावर आले, तेव्हा श्रीलंका संघाच्या राष्ट्रगीतावेळी एक अशी घडना घडली, ज्याने सर्वांनाच धक्का दिला. नक्की काय-काय घडलं, ते सर्व जाणून घेऊयात…
नेमकं काय घडलं?
या सामन्यात ज्यावेळी श्रीलंका (Sri Lanka) संघाचे राष्ट्रगीत (National Anthem) सुरू होते, तेव्हा कुसल मेंडिस (Kusal Mendis) याच्या पुढे असलेला मुलगा अचानक बेशुद्ध झाला. श्रीलंका संघाचा कर्णधार कुसल मेंडिस याने आपल्यापुढे उभ्या असलेल्या त्या मुलाला लगेच सांभाळण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान अफगाणिस्तानचाही एक खेळाडू त्या मुलाजवळ पोहोचला. मात्र, तोपर्यंत हे स्पष्ट झाले नव्हते की, तो मुलगा बेशुद्ध का झाला होता? या घटनेने मैदानावर उपस्थित खेळाडूंसह स्टेडिअममधील प्रेक्षकही हैराण झाले. मात्र, या घटनेमुळे सामना सुरू होण्यात कोणताही उशीर झाला नाही. आता यादरम्यानचा फोटो व्हायरल होत आहे.
https://twitter.com/The_SportsTiger/status/1718910448601628933?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1718910448601628933%7Ctwgr%5E674f47f0f9e72ba83f2420b0e12b5fc9ee96d401%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fcrictoday.com%2Fcricket%2Fdaily-cricket-news%2Fmascot-kid-faints-during-afghanistan-sri-lanka-national-anthems-players-offer-help%2F
https://twitter.com/DavidBrentIPL/status/1718908306545147947?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1718908306545147947%7Ctwgr%5E8621d57571b22cfe8de51b92393e4e3a7708c2d6%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.indiatv.in%2Fsports%2Fcricket%2Fworld-cup-2023-during-national-anthem-in-afghanistan-vs-sri-lanka-match-a-kid-just-fainted-2023-10-30-998049
सामन्याचा आढावा
या सामन्यात अफगाणिस्तान संघाने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. कर्णधार हशमतुल्लाह शाहिदी (Hashmatullah Shahidi) याचा हा निर्णय गोलंदाजांनी योग्य असल्याचे सिद्ध केले. यावेळी श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करताना 49.3 षटकात सर्व विकेट्स गमावत 241 धावा केल्या होत्या. या 242 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना अफगाणिस्तानने 45.2 षटकात 3 विकेट्स गमावत 242 धावा केल्या. या धावा करताना तीन खेळाडूंनी अर्धशतक केले. यामध्ये अझमतुल्लाह उमरजाई (नाबाद 73), हशमतुल्लाह शाहिदी (नाबाद 58) आणि रहमत शाह (62) यांचा समावेश होता.
या सामन्यात श्रीलंकेच्या डावात गोलंदाजी करताना अफगाणिस्तानचा फजलहक फारूकी चमकला. त्याने 10 षटके गोलंदाजी करताना 34 धावा खर्चून सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. त्याला या कामगिरीसाठी सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. त्याच्याव्यतिरिक्त मुजीब उर रहमानने 2, तर अझमतुल्लाह उमरजाई आणि राशिद खान यांनाही एक विकेट मिळाली. (icc world cup 2023 during national anthem in afghanistan vs sri lanka match a kid just fainted 2023)
हेही वाचा-
ईडन गार्डन्सवर द.आफ्रिकेशी भिडणार 70 हजार विराट! कॅब करणार कोहलीच्या ‘बर्थ डे’चे जंगी सेलिब्रेशन
श्रीलंकेला मात दिल्यावर मनापासून बोलला अफगाण कर्णधार! म्हणाला, “अभिमान वाटावा असाच हा संघ…”