भारतात होणाऱ्या वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेची सुरुवात होण्यास आता जास्त वेळ उरला नाहीये. काही काळातच तिकीटांच्या विक्रीलाही सुरुवात होईल. स्पर्धेतील काही सामन्यांच्या तारखा अलीकडेच बदलल्या होत्या. अहमदाबाद आणि कोलकातामध्ये होणाऱ्या सामन्यांच्या तारखांमध्ये बदल करण्यात आला होता. अशातच हैदराबाद क्रिकेट असोसिएशनने बीसीसीआयची चिंता वाढवली आहे. एचसीएने बीसीसीआयला पत्र लिहून म्हटले आहे की, ते सलग 2 सामन्यांचे आयोजन करू शकत नाहीत. हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडिअममध्ये 9 आणि 10 ऑक्टोबर रोजी सलग दोन सामने खेळले जाणार आहेत.
हैदराबादमध्ये 9 ऑक्टोबर रोजी न्यूझीलंड आणि नेदरलँड (New Zealand vs Netherlands) संघात वनडे विश्वचषक 2023 (ODI World Cup 2023) स्पर्धेतील सामना खेळला जाणार आहे. त्यानंतर 10 ऑक्टोबर रोजी पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका (Pakistan vs Sri Lanka) संघात सामना खेळला जाईल. माध्यमांतील वृत्तांनुसार, हैदराबाद क्रिकेट असोसिएशनने (Hyderabad Cricket Association) बीसीसीआयला पत्र लिहिले आहे. हैदराबाद क्रिकेटने (Hyderabad Cricket) या दोन सामन्यांमध्ये अंतर ठेवण्याची मागणी केली आहे. त्यांच्या मते, सुरक्षेची व्यवस्था लक्षात घेऊन तारखेत बदल केला गेला पाहिजे.
वृत्तांनुसार, हैदराबाद पोलिसांनी सलग दोन सामन्यांसाठी पुरवल्या जाणाऱ्या सुरक्षेच्या व्यवस्थेबाबत चिंता व्यक्त केली होती. हैदराबादमध्ये पाकिस्तान क्रिकेट संघाचाही सामना होणार आहे. या सामन्यासाठी कडक सुरक्षा असेल. हैदराबादमध्ये एकूण 3 सामने खेळले जाणार आहेत. पहिला सामना पाकिस्तान विरुद्ध नेदरलँडमध्ये 6 ऑक्टोबर रोजी खेळला जाईल. त्यानंतर दुसरा सामना 9 ऑक्टोबर रोजी आणि तिसरा 10 ऑक्टोबर रोजी आयोजित केला जाईल. भारत विरुद्ध पाकिस्तान (India vs Pakistan) संघात 14 ऑक्टोबर रोजी सामना खेळला जाणार आहे. या सामन्यापूर्वीही पाकिस्तानने वेळेची मागणी केली होती.
बहुप्रतिक्षित विश्वचषकाला 5 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. यातील पहिला सामना गतविजेत्या इंग्लंड विरुद्ध उपविजेत्या न्यूझीलंड संघात अहमदाबाद येथे खेळला जाईल. स्पर्धेतील पहिला उपांत्य सामना 15 नोव्हेंबर रोजी खेळला जाईल. तसेच, दुसरा उपांत्य सामना 16 नोव्हेंबर रोजी आयोजित होईल. स्पर्धेचा अंतिम सामना 19 नोव्हेंबर रोजी अहमदाबाद येथे खेळला जाईल. (icc world cup 2023 hyderabad cricket association requested bcci to change match date pak vs sl read here)
महत्त्वाच्या बातम्या-
काळी जादू! Asia Cup 2023 जिंकण्यासाठी आगीच्या निखाऱ्यांवर चालला ‘हा’ क्रिकेटर, व्हिडिओ जगभरात व्हायरल
आतल्या गोटातील बातमी! Asia Cupमध्ये ‘या’ 17 धुरंधरांना मिळू शकते Team Indiaमध्ये संधी, एक नाव हैराण करणारे