---Advertisement---

फिकीर नॉट! अहमदाबादेत IND vs PAK सामना झाला नाही, तर कुठे होईल महामुकाबला? लगेच वाचा

On: गुरूवार, जून 29, 2023 7:03 PM
Virat-Kohli
---Advertisement---

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळ या बोर्डांनी मंगळवारी (दि. 27 जून) वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेच्या वेळापत्रकाची घोषणा केली. संपूर्ण जगाचे लक्ष या वेळापत्रकावर होतेच, परंतु ज्याची सर्वाधिक प्रतीक्षा होती, तो भारत विरुद्ध पाकिस्तान संघातील सामना होता. आयसीसी बोर्डाने निश्चित केलेल्या वेळापत्रकानुसार, भारत-पाकिस्तान संघातील सामना 15 ऑक्टोबर रोजी गुजरातची राजधानी असलेल्या अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडिअमवर खेळला जाणार आहे. मात्र, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला हे मान्य नाहीये.

बीसीसीआयने ज्यावेळी वेळापत्रकाचा पहिला ड्राफ्ट आयसीसी आणि इतर बोर्डांकडे सोपवला होता, तेव्हा सुरक्षेचे कारण देऊन पाकिस्तानने अहमदाबादेत खेळण्यास नकार दर्शवला होता. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने असेही म्हटले होते की, विश्वचषकासाठी भारतात येण्यापूर्वी त्यांना त्यांच्या सरकारकडून परवानगी घ्यावी लागेल.

मात्र, नुकत्याच समोर आलेल्या रिपोर्टनुसार, जर पाकिस्तान सरकारने आपल्या संघाला अहमदाबादमध्ये खेळण्याची परवानगी दिली नाही, तर चेन्नईचा पर्याय म्हणून वापर केला जाऊ शकतो. पाकिस्तानी पत्रकाराने एका रिपोर्टरचा हवाला देत ट्वीट केले. त्याने ट्वीटमध्ये लिहिले की, “जर पाकिस्तान सरकारने आपल्या संघाला भारताविरुद्ध अहमदाबाद येथे खेळण्यास परवानगी दिली नाही, तर चेन्नईचा पर्याय म्हणून वापर केला जाऊ शकतो.”

मंगळवारी बीसीसीआयने वनडे विश्वचषक 2023 (ODI World Cup 2023) स्पर्धेची घोषणा केली. यावेळी विश्वचषकात 10 संघ भाग घेत आहेत. प्रत्येक संघ 9 सामने खेळेल. साखळी फेरीत एकूण 45 सामने होणार आहेत. यानंतर 2 उपांत्य सामने आणि अंतिम सामना खेळला जाईल. स्पर्धेतील पहिला सामना 5 ऑक्टोबर रोजी खेळला जाईल. हा सामना इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड संघात होईल. तसेच, 19 नोव्हेंबर रोजी अंतिम सामना खेळला जाईल. खरं तर, 2019 वनडे विश्वचषकाचा अंतिम सामनाही इंग्लंड आणि न्यूझीलंड संघात खेळला गेला होता. त्यात धावा आणि सुपर ओव्हरही बरोबरीत सुटल्यामुळे चेंडू जास्त वेळा सीमारेषेच्या पलीकडे पाठवल्यामुळे इंग्लंडला विजयी घोषित केले गेले होते.

वनडे विश्वचषकात 8 संघ आधीच पात्र ठरले आहेत. तसेच, इतर दोन संघांसाठी झिम्बाब्वे येथे पात्रता फेरी खेळली जात आहे. विश्वचषकातील शेवटचे 2 संघ कोण असतील, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (icc world cup 2023 india vs pakistan match chennai is the backup option for ahmedabad says reports)

महत्वाच्या बातम्या-
‘विराटवर जळतो गंभीर, त्याचं यश पचवू शकत नाही…’, पाकिस्तानी खेळाडूने आगीत ओतलं तेल
MPL : अर्रर्र! क्लीन बोल्डचा निर्णयही थर्ड अंपायरलाच द्यावा लागला, पण का ओढवली अशी वेळ?

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---