वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेतील 23वा सामना दक्षिण आफ्रिका विरुद्ध बांगलादेश संघात मंगळवारी (दि. 24 ऑक्टोबर) खेळला जाणार आहे. हा सामना मुंबई येथील वानखेडे स्टेडिअमवर खेळला जाणार आहे. हा सामना जिंकणे आफ्रिकेपेक्षा बांगलादेशसाठी खूपच महत्त्वाचे आहेत. कारण, त्यांनी आतापर्यंत खेळलेल्या 4 सामन्यांपैकी सलग 3 सामने गमावले आहेत. दुसरीकडे, आफ्रिका संघ तुफान फॉर्ममध्ये आहे. त्यांनी 4 पैकी फक्त 1 सामना गमावला आहे. अशात आफ्रिकेला उपांत्य सामन्याच्या शर्यतीत कायम राहण्यासाठी हा सामना जिंकावा लागेल. चला तर, वानखेडेवरील या सामन्याविषयी जाणून घेऊयात…
मुंबईच्या खेळपट्टीवर फलंदाज दाखवणार का दम?
दक्षिण आफ्रिका विरुद्ध बांगलादेश (South Africa vs Bangladesh) संघातील या सामन्याला भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 2 वाजता सुरुवात होईल. मुंबईच्या खेळपट्टीवर फलंदाजी करणे नेहमीच सोपे मानले जाते. इथे खेळल्या गेलेल्या मागील सामन्यात दक्षिण आफ्रिका संघाने इंग्लंडविरुद्ध 399 धावांचा डोंगर उभारला होता. मात्र, इंग्लंड संघ या आव्हानाचा पाठलाग करताना 200पेक्षा कमी धावांवर सर्वबाद झाला होता. अशात नाणेफेक या सामन्यात मोठी भूमिका बजावू शकते. तसेच, सामना जसजसा पुढे जाईल, तशी खेळपट्टीतून फिरकीपटूंना मदत मिळायला सुरुवात होते.
हवामान काय सांगतं?
या सामन्यादरम्यान हवामानाविषयी बोलायचं झालं, तर रिपोर्ट्नुसार, पावसाची कोणतीही शक्यता नाहीये. तसेच, किमान तापमान 35 अंश सेल्सियस, तर कमाल तापमान 27 अंश सेल्सियसच्या आसपास राहण्याची शक्यता आहे.
वानखेडेवरील आकडे
वनडे क्रिकेटमधील वानखेडे स्टेडिअमवरील आकडे पाहिले, तर इथे एकूण 24 सामने खेळले गेले आहेत. यामध्ये प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने 12 वेळा विजय मिळवला आहे, तर 12 संघांनी आव्हानाचा पाठलाग करताना विजय मिळवला आहे. (icc world cup 2023 sa vs ban wankhede stadium mumbai pitch report weather and stats )
विश्वचषक 2023 स्पर्धेसाठी दोन्ही संघांचे स्क्वॉड
दक्षिण आफ्रिका
क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), रीजा हेंड्रिक्स, रासी व्हॅन डर ड्युसेन, एडेन मार्करम, हेन्रीच क्लासेन, डेविड मिलर, मार्को यान्सेन, जेराल्ड कोएट्जी, केशव महाराज, कागिसो रबाडा, लुंगी एन्गिडी, तबरेज शम्सी, एँडिले फेहलुक्वायो, टेम्बा बावुमा (कर्णधार), लिजाद विलियम्स
बांगलादेश
तंजीद हसन, लिटन दास, नजमुल होसेन शांतो, मेहिदी हसन मिराज, तौहीद हृदोय, मुश्फिकुर रहीम (यष्टीरक्षक), महमुदुल्लाह, नसुम अहमद, मुस्तफिजुर रहमान, शोरिफुल इस्लाम, हसन महमूद, तंजीम हसन साकिब, महेदी हसन, तस्कीन अहमद, शाकिब अल हसन (कर्णधार).
हेही वाचा-
झुमे जो पठाण! पाकिस्तानच्या पराभवानंतर इरफानने राशिदसोबत दोनदा लावले ठुमके, 3 चुकाही टाकल्या सांगून- Video
‘अजय जडेजामुळे…’, अफगाणिस्तानच्या धमाकेदार विजयानंतर सचिन तेंडुलकरची रिऍक्शन व्हायरल