विश्वचषक 2023 स्पर्धा दिवसेंदिवस अधिकच रंजक बनत चालली आहे. अशात सोमवारी (दि. 23 ऑक्टोबर) पाकिस्तान विरुद्ध अफगाणिस्तान संघ विश्वचषकाच्या 22व्या सामन्यात मोठा उलटफेर पाहायला मिळाला. पाकिस्तान 8 विकेट्सने पराभूत होताच स्पर्धेतील तिसरा मोठा उलटफेर केला. अफगाणिस्तानने आधी इंग्लंडचा आणि आता पाकिस्तानचा धुव्वा उडवला. तसेच, दक्षिण आफ्रिकेला नेदरलँड्सने नमवले होते.
या विजयानंतर अफगाणिस्तानच्या खेळाडूंचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. आजी-माजी क्रिकेटपटू यावर प्रतिक्रिया देत आहेत. यामध्ये महान फलंदाज सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) याच्या नावाचाही समावेश आहे. सचिने लक्षवेधी प्रतिक्रिया दिली आहे. चला तर, जाणून घेऊयात सचिन काय म्हणालाय…
‘अजय जडेजामुळे…’
सचिन तेंडुलकर ट्वीट (Sachin Tendulkar) करत म्हणाला की, “या विश्वचषकात अफगाणिस्तान संघाचे अद्भूत राहिले आहे. बॅटसोबत त्यांची शिस्त आणि त्यांनी जो स्वभाव दाखवला आहे, तो शानदार आहे. खेळपट्टीवर आक्रमक धाव त्यांची कठोर मेहनत दाखवते.” यानंतर सचिनने मजेशीर अंदाजात म्हटले की, “हे संभाव्यत: अजय जडेजा याच्या प्रभावामुळे असू शकते. एका मजबूत गोलंदाजी फळीसोबत इंग्लंड आणि पाकिस्तानसारख्या संघांवर त्यांचा विजय एक नवीन अफगाणिस्तान संघाच्या उदयाचे संकेत देत आहे.” आता सचिनची ही प्रतिक्रिया सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
Afghanistan's performance at this World Cup has been nothing short of outstanding. Their discipline with the bat, the temperament they've shown, and aggressive running between the wickets reflects their hard work. It could possibly be due to a certain Mr. Ajay Jadeja's influence.… pic.twitter.com/12FaLICQPs
— Sachin Tendulkar (@sachin_rt) October 23, 2023
अफगाणिस्तानचा मार्गदर्शक
भारतीय संघाचा माजी खेळाडू अजय जडेजा (Ajay Jadeja) याला अफगाणिस्तान संघाचा मार्गदर्शक बनवले गेले आहे. अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने जडेजावर विश्वचषक 2023 (World Cup 2023) स्पर्धेसाठी अफगाणिस्तानच्या मार्गदर्शकाची जबाबदारी सोपवली आहे. इंग्लिश प्रशिक्षक जोनाथन ट्रोट आणि अजय जडेजा यांनी संघाला नवसंजीवनी दिली आहे. मात्र, जडेजा याचे श्रेय घेत नाही. मागील काही दिवसांपूर्वीच त्याने म्हटले होते की, “मी या संघासोबत फक्त प्रवाशासारखा आहे.”
Mentor Ajay Jadeja enjoying with Afghanistan Cricket Team after beating Pakistan.pic.twitter.com/WrMnBODaHP
— Abhishek (@vicharabhio) October 23, 2023
विशेष म्हणजे, संघाने जेव्हा पाकिस्तानविरुद्ध शानदार विजय मिळवला, तेव्हा अजय जडेजा संघातील सहकाऱ्यांसोबत डगआऊटमध्ये याचा जल्लोष करतानाही दिसला. (pak vs afg ajay jadeja influence legend cricketer sachin tendulkar reaction viral after afghanistan win)
हेही वाचा-
विजय एक, विक्रम अनेक! अफगाण सेनेनं उभारली रेकॉर्ड्सची भिंत, पाकविरुद्ध ‘असा’ पराक्रम करणारा जगातला पहिलाच संघ
ऐतिहासिक विजयासह अफगाणी सेनेची Points Tableमध्ये ‘या’ स्थानी गरुडझेप, Englandला वाटत असेल स्वत:ची लाज