भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील पहिला उपांत्य सामना 15 ऑक्टोबरला वानखेडे क्रिकेट स्टेडियम मुंबई येथे झाला. या सामन्यादरम्यान इंग्लंडचा माजी स्टार फुटबॉलपटू डेव्हिड बेकहॅमही सामना पाहण्यासाठी आला होता. सामना पाहिल्यानंतर डेव्हिड बेकहॅम नीता अंबानी याना भेटण्यासाठी मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया येथील घरी पोहोचला. यादरम्यान अंबानी कुटुंबाने डेव्हिड बेकहॅमचे स्वागत केले आणि त्यांना मुंबई इंडियन्सची जर्सीही भेट दिली.
अँटिलियातील कार्यक्रमातील एका फोटोत मुकेश अंबानी, नीता अंबानी (Neeta Ambani) आणि त्यांचे कुटुंब बेकहॅमसोबत दिसत आहे. या फोटोत डेव्हिड बेकहॅम (David Beckham) याने हातात 7 नंबरची जर्सी धरल्याचे दिसून येते. ही जर्सी मुंबई इंडियन्सची आहे, ज्यावरती 7 क्रमांक लिहिलेला आहे. डेव्हिड बेकहॅमसाठी ही भेट खूपच खास आहे. टाटा आयपीएल पूर्वी डेव्हिड बेकहॅमसाठी मुंबई इंडियन्सची ही जर्सी खूप खास आहे.
From Manchester’s Red to Mumbai’s Blue & Gold – 𝗡𝗼.𝟳 𝗕𝗘𝗖𝗞𝗛𝗔𝗠 💙#OneFamily #MumbaiIndians #DavidBeckham pic.twitter.com/Vjch6La8gr
— Mumbai Indians (@mipaltan) November 16, 2023
मुंबईतील वानखेडे क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात भारताने एकतर्फी विजय मिळवला आहे. भारताने हा सामना 70 धावांनी जिंकला. मात्र, मधल्या षटकांमध्ये हा विजय तितकासा सोपा वाटत नव्हता. न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन आणि फलंदाज डॅरिल मिचेल यांनी न्यूझीलंडचा डाव सांभाळताना दीडशेहून अधिक धावांची भागीदारी केली. मात्र, मोहम्मद शमीने आपली जादू दाखवत 7 विकेट्स घेत संघाला विजयापर्यंत नेले. भारताचा स्टार खेळाडू विराट कोहलीने या सामन्यात आपले 50 वे शतक झळकावून इतिहास रचला. आता कोहली एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके झळकावणारा फलंदाज बनला आहे. (ICC world cup: David Beckham meets Ambani family Nita Ambani honored with special Mumbai Indians jersey)
म्हत्वाच्या बातम्या
टीम इंडियासाठी वाईट बातमी! ऑस्ट्रेलिया-दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी20 मालिकेतून बाहेर होऊ शकतो ‘हा’ पठ्ठ्या
ICC world cup: बेकहॅम-रोहितने केली जर्सीची आदला-बदली; हिटमॅनला फायनलसाठी दिल्या शुभेच्छा, पाहा व्हिडिओ