तिसऱ्या आणि शेवटच्या कसोटी सामव्यात श्रीलंकेने इंग्लंडचा 8 गडी राखून पराभव केला. याआधी श्रीलंकेने 2014 मध्ये इंग्लंडविरुद्ध त्यांच्या घरच्या मैदानावर कसोटी सामना जिंकली होता. आता 10 वर्षांनंतर इतिहासाची पुनरावृत्ती करत श्रीलंकेने पुन्हा एकदा इंग्लंडला त्यांच्या घरच्या मैदानावर कसोटी सामन्यात पराभूत केले. त्यामुळे श्रीलंकेच्या या विजयानंतर टीम इंडियाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पॉइंट टेबलमध्ये नुकसान झाला का? या सामन्यानंतर पॉइंट टेबलची स्थिती काय आहे ते जाणून घेऊया.
इंग्लंडविरुद्धच्या विजयासह श्रीलंकेने जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत स्वतःला पाचव्या क्रमांकावर आणले आहे. श्रीलंकेने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023-25 च्या सर्कलमध्ये आतापर्यंत 7 सामने खेळले आहेत. ज्यामध्ये 3 जिंकले आहेत आणि 4 गमावले आहेत. संघाची विजयाची टक्केवारी 42.86 आहे. तर पराभूत झालेला इंग्लंड सहाव्या स्थानावर आहे. या सर्कलमध्ये इंग्लंडने आतापर्यंत 16 कसोटी सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्यांनी 8 जिंकले, 7 गमावले आणि 1 अनिर्णित राहिले. इंग्लंडची विजयाची टक्केवारी 42.19 आहे.
Sri Lanka leapfrog England on the #WTC25 standings thanks to victory at The Oval 🤝
More from #ENGvSL 👉 https://t.co/nY7XEQHxqh pic.twitter.com/247Nqdg4mX
— ICC (@ICC) September 10, 2024
श्रीलंकेच्या इंग्लंडविरुद्धच्या विजयामुळे भारतीय संघाला जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत कोणतेही नुकसान झालेले नाही. या सामन्यापूर्वीही टीम इंडिया गुणतालिकेत अव्वल स्थानावर होती आणि अजूनही आहे. भारतीय संघाने या सर्कलमध्ये आतापर्यंत 9 कसोटी सामने खेळले आहेत. ज्यामध्ये 6 जिंकले, 2 हरले आणि 1 अनिर्णित राहिले आहे. टीम इंडियाची विजयाची टक्केवारी 68.52 आहे.
भारतीय संघ बांग्लादेशविरुद्ध पुढील कसोटी मालिका खेळणार आहे. भारत आणि बांग्लादेश यांच्यात 2 कसोटी सामने खेळले जाणार आहेत. ज्याला 19 सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पॉइंट टेबलमध्ये टीम इंडिया अव्वल स्थानावर आहे. त्यानंतर ऑस्ट्रेलिया 62.50 च्या विजयाच्या टक्केवारीसह दुसऱ्या, न्यूझीलंड 50.00 च्या विजयाच्या टक्केवारीसह तिसऱ्या, बांग्लादेश 45.83 च्या विजयाच्या टक्केवारीसह चौथ्या आणि श्रीलंका 42.86 च्या विजयाच्या टक्केवारीसह पाचव्या स्थानावर आहे.
हेही वाचा-
भारत-बांग्लादेश मालिकेत बनणार आश्चर्यकारक विक्रम! रोहित-विराट-अश्विनला सुवर्ण संधी
‘पुन्हा येणार नाही’, ग्रेटर नोएडाची ‘खराब व्यवस्था’ पाहून अफगाणिस्तान संघ संतप्त
हे दोन खेळाडू पुढे जाऊन भारताचे नेतृत्तव करणार; दिनेश कार्तिकची भविष्यवाणी