आफ्रिकन संघाने वेस्ट इंडिजविरुद्धचा दुसरा कसोटी सामना 40 धावांनी जिंकला आहे. या विजयामुळे आफ्रिकेने 2 सामन्यांची कसोटी मालिका 1-0 ने जिंकली आहे. दुसऱ्या कसोटीतील विजयासह दक्षिण आफ्रिकेने जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत पाकिस्तानला मोठा धक्का दिला आहे. त्यामुळे आफ्रिकेच्या विजयाने टीम इंडियालाही धक्का बसला आहे का? आफ्रिकेच्या विजयानंतर पॉइंट टेबलमध्ये काय बदल झाले ते जाणून घेऊया.
वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीतील विजयासह दक्षिण आफ्रिकेने पाकिस्तानला मागे टाकत जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत पाचव्या स्थानावर मजल मारली आहे. आफ्रिकेने 2023-25 च्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या सर्कलमध्ये आतापर्यंत 6 कसोटी सामने खेळले आहेत, ज्यात त्यांनी 2 जिंकले, 3 गमावले आणि 1 अनिर्णित राहिला. तर पाकिस्तानने आतापर्यंत 5 सामने खेळले आहेत, ज्यात 2 जिंकले आणि 3 हरले. आफ्रिकेची विजयाची टक्केवारी 38.89 आहे, तर पाकिस्तानची विजयाची टक्केवारी 36.66 आहे. पाकिस्तानला 21 ऑगस्टपासून बांगलादेशविरुद्ध 2 सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे, जी जिंकून पाकिस्तानी संघ दक्षिण आफ्रिकेला पराभूत करू शकतो.
दक्षिण आफ्रिकेच्या विजयामुळे गुणतालिकेत भारतीय संघाचे कोणतेही नुकसान झाले नाही. वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटीआधीही टीम इंडिया अव्वल स्थानावर होती, तर या सामन्यानंतरही टीम इंडिया पहिल्या क्रमांकावर आहे. भारतीय संघाने या दरम्यान आतापर्यंत 9 कसोटी सामने खेळले आहेत, ज्यात 6 जिंकले, 2 हरले आणि 1 अनिर्णित राहिला. टीम इंडियाची विजयाची टक्केवारी 68.51 आहे.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023-25 सायकलच्या पॉइंट टेबलमध्ये टीम इंडिया अव्वल स्थानावर आहे. त्यानंतर ऑस्ट्रेलिया दुसऱ्या क्रमांकावर आहे. ऑस्ट्रेलियाची विजयाची टक्केवारी 62.50 आहे. पुढे न्यूझीलंड तिसऱ्या, श्रीलंका चौथ्या आणि दक्षिण आफ्रिका पाचव्या स्थानावर आहे. न्यूझीलंड आणि श्रीलंका यांच्या विजयाची टक्केवारी 50-50 आहे. तर दक्षिण आफ्रिकेची विजयाची टक्केवारी 38.89 आहे.
हेही वाचा-
शाळेच्या गणवेशात मुलीने केली बुमराहची बॉलिंग ॲक्शन, पाहा VIDEO
राहुल द्रविडच्या मुलाने ठोकला खणखणीत षटकार, व्हिडिओ होतोय तुफान व्हायरल
‘ही अशी ट्रॉफी..’, बॉर्डर-गावस्कर मालिका जिंकण्यासाठी पॅट कमिन्स आतुर!