आयसीसीने हॉल ऑफ फेमची सुरवात 2 जानेवारी 2009 मध्ये फेडरेशन ऑफ इंटरनॅशनल क्रिकेटर्स असोसिएशन (एफआयसीए) च्या सहकार्याने केली.
या हॉल ऑफ फेममध्ये दरवर्षी क्रिकेटमधील वेगवेगळ्या दिग्गजांचा सामावेश करण्यात येतो. पण त्याचबरोबर त्याला काही नियमही करण्यात आले आहेत.
हॉल ऑफ फेममध्ये समावेश होण्यासाठी फलंदाजाने वनडे किंवा कसोटी प्रकारापैकी एका प्रकारात कमीतकमी 8000 धावा आणि 20 शतके केलेली असायला हवीत किंवा त्याची सरासरी 50 पेक्षा जास्त असायला हवी.
त्याचबरोबर गोलंदाजाचा हॉल ऑफ फेममध्ये समावेश होण्यासाठी वनडे किंवा कसोटी प्रकारापैकी एका प्रकारात 200 पेक्षा जास्त विकेट्स घेतलेल्या असल्या पाहिजे.तसेच त्याचा स्ट्राईक रेट कसोटीत 50 आणि वनडेच 30 असायला हवा.
यष्टीरक्षकांसाठी वनडे किंवा कसोटी प्रकारांपैकी एका प्रकारात किंवा दोन्ही प्रकारात 200 पेक्षा जास्त विकेट्स घ्यायला हव्यात. तर कर्णधाराने जर 25 कसोटीत किंवा 100 वनडेत नेतृत्व करताना किमान एका प्रकारात तरी जिंकण्याची टक्केवारी 50 पेक्षा जास्त ठेवली असेल तर त्याचाही हॉल ऑफ फेममध्ये समावेश केला जावू शकतो.
महत्त्वाचे म्हणजे ज्या खेळाडूंचा हॉल ऑफ फेममध्ये समावेश होणार आहे, त्या खेळाडूंनी पाच वर्षांत कोणत्याही आंतरराष्ट्रीय स्थरावर खेळलेले नसावे.
याबरोबरच या नियमात न बसणाऱ्या विशिष्ट खेळाडूंनाही हॉल ऑफ फेममध्ये सामाविष्ठ केले जाऊ शकते. पण त्यासाठी नामांकन समितीच्या सदस्यांच्या मते त्या खेळाडूने क्रिकेट इतिहासात मोठे काम केलेले असले पाहिजे.
तसेच अशा खेळाडूंचे नामांकन करण्याच्या नियमात प्रमुख पत्रकार, पंच, मॅच रेफरी किंवा प्रशासक यांनाही खेळाडूंचे नामांकन करण्याची परवानगी देता येते.
तसेच आत्तापर्यंत भारताच्या बिशन सिंग बेदी, सुनिल गावस्कर, कपिल देव, अनिल कुंबळे, राहुल द्रविड आणि सचिन तेंडूलकर अशा 6 खेळाडूंचा हॉल ऑफ फेममध्ये सामावेश करुन गौरव करण्यात आला आहे.
२०१९मध्ये आयसीसीने सचिन तेंडूलकर, एॅलन डोनाल्ड व कॅथरिन फिझपॅट्रिक यांचा आयसीसी हाॅल ऑफ फेममध्ये समावेश केला. त्यानंतर अजून तरी कुणाचाही या यादीत समावेश केला नाही.
ट्रेंडिंग घडामोडी-
-आयपीएलमध्ये करोडोंची कमाई करुन मालामाल झालेले ५ अष्टपैलू
-आयुष्यात पहिल्यांदाच घेतलेली काॅफी पंड्याला पडली भलतीच महागात
-जर आयपीएल झाली नाही तर १० कोटींवर पाणी सोडावे लागणारे ५ खेळाडू