सध्या इंग्लंड आणि पाकिस्तान संघात कसोटी मालिका सुरु आहे. मालिकेतील पहिला सामना रावळपिंडी येथे खेळवला जात असून शेवटच्या दिवशी पाकिस्तान संघाला विजयासाठी 343 धावांची गरज आहे. रावळपिंडी येथे खेळवल्या जाणाऱ्या या कसोटी सामन्यात धावांचा पाऊस पडतोय. रावळपिंडीच्या या सपाट खेळपट्टीवर इंग्लंड संघाने पहिल्या डावात 657 धावांचा डोंगर उभारला होता. या आव्हानाला पाकिस्ताननेही जशास तसे उत्तर देत 579 धावा केल्या. त्यानंतर या खेळपट्टीवर अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आलेे. अशातच आईसलॅंड क्रिकेेट बोर्डानेही या वाहत्या गंगेत हात धुतले आहेत. आईसलॅंड क्रिकेट बोर्डाने पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेची खिल्ली उडवत रमीझ राजा यांच्यावर निशाना साधला आहे.
पाकिस्तान आणि इंग्लंड संघात सुरु कसोटी सामना असताना आईसलॅंड क्रिकेट बोर्डानेे पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेची खिल्ली उडवली आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष रमीझ राजा (Ramiz Raja) यांनी रावळपिंडीच्या सपाट खेळपट्टीवर सहजरीत्या धावा बनत असल्याने ते म्हणाले होते की हे खूूप लाजीरवाणे आहे. आईसलॅंड क्रिकेट बोर्डाने 2008मध्ये पाकिस्तानात आलेल्या वैश्विक वित्तीय संकटाची तुलना एका मजेशीर पद्धतीने केली आहे. त्यांनी त्यांच्या ट्वीटमध्ये म्हटले की जो पर्यंत आर्थिक मंदीने सर्व काही बदलून नाही टाकले, तो पर्यंत सर्वांना वाटत होते पाकिस्तान आर्थिकदृष्ट्या स्थिर आहे.
If Pakistan lose this Test, it won't look very good after @iramizraja said the pitch was "an embarrassment" due to how easy it was to bat on. It's a bit like how prosperous we thought our banks were in 2007, then 2008 happened.
— Iceland Cricket (@icelandcricket) December 4, 2022
रमीझ राजांच्या ट्वीटला प्रतिक्रिया देत आईसलॅंड क्रिकेट बोर्डाने लिहिले की, “जर पाकिस्तान हा कसोटी सामना हारला, तर हे अजिबात चांगले वाटणार नाही की रमीझ राजा म्हणाले होते की किती लाजिरवाणी खेळपट्टी आहे कारण येथे धावा करणेे खूप सोपे आहे. जसे की आपल्या सगळ्यांना वाटले होते की आपल्या बॅंका किती समृद्ध आहेत आणि नंतर 2008ची आर्थिक मंदी आली.” म्हणजेच 2007 पर्यंत सर्वांना वाटत होते की, आपल्या देशाची आर्थिक स्थिती खूप चांगली आहे. मात्र, त्यानंतर 2008मध्ये आलेल्या आर्थिक मंदीने आपल्या आर्थिक व्यवस्थेचे पितळ उघडे पडले.
पहिल्या कसोटी सामन्याच्या शेवटच्या दिवशी पाकिस्तानला 343 धावांची गरज होती. तिसऱ्या सत्रात पाकिस्तान संघाच्या 7 बाद 262 धावा झाल्या असून त्यांना विजयासाठी 81 धावांची गरज आहे आणि इंग्लंड संघाला विजयासाठी 3 विकेट्स हव्या आहेत.(Iceland Cricket Board has mocked PCB by comparing Ravalpindi test with over 2008 great reccession)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
रिषभ स्वतः संघातून बाहेर पडला? बांगलादेशमधून आली धक्कादायक माहिती समोर
पहिल्या महिला अंडर 19 विश्वचषकासाठी भारतीय संघ जाहीर; शफाली करणार नेतृत्व