पाकिस्तान क्रिकेट संघाला इतिहासात पहिल्यांदाच घरच्या मैदानावर तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील एकही सामना जिंकता आला नाही. पाकिस्तान विरुद्ध इंग्लंड (PAKvENG) यांच्यात मालिकेतील शेवटचा सामना कराचीमध्ये खेळला गेला. ज्यामध्ये इंग्लंड 8 विकेट्सने जिंकला. या सामन्याच्या तिसऱ्याच दिवशी यजमान संघाची स्थिती कठीण झाली होती. पराभव समोर दिसत असताना एका क्रिकेट संघाने ट्वीट करत त्यांच्या जखमेवर मात्र मीठ चोळण्याचे काम केले आहे.
इंग्लंडने ज्याप्रकारे पाकिस्तानविरुद्धच्या कसोटी मालिकेत प्रदर्शन केले ते पाकिस्तान कधीही विसरणार नाही. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात प्रथमच पाकिस्तानने घरच्या मैदानावर कसोटी मालिका गमावली आहे. कराची कसोटीचा मंगळवारी (20 डिसेंबर) चौथ्या दिवसाच्या पहिल्याच सत्रात इंग्लंडने विजय मिळवला. या सामन्याच्या तिसऱ्या दिवशी पाकिस्तानची अवस्था पाहून आईसलॅंड क्रिकेटने त्यांना चांगलेच ट्रोल केले आहे.
आईसलॅंड क्रिकेट बोर्डने त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर पाकिस्तान क्रिकेटला टॅग करत लिहिले, ‘पाकिस्तान क्रिकेट बोर्डसाठी संदेश. आम्ही पाकिस्तानला येऊन 3-0 ने दारूणपणे हरण्यास तयार आहोत. त्यामध्ये आम्ही 7.0च्या वेगाने नाहीतर 0.7च्या रनरेटने वा करू.’
आईसलॅंड क्रिकेट संघाला अद्याप कसोटी खेळण्याचा दर्जा प्राप्त झाला नाही. त्यांच्या या ट्वीटने मात्र सोशल मीडियावर एकच खळबळ माजली आहे.
Message to @TheRealPCB, we are happy to come and tour Pakistan and lose 3-0, getting chopped up and sugared like marmalade. Just letting you know in the interests of balance. And we will score at 0.7 not 7.0 an over.
— Iceland Cricket (@icelandcricket) December 19, 2022
इंग्लंड कर्णधार बेन स्टोक्स आणि मुख्य प्रशिक्षक ब्रेंडन मॅक्युलम यांच्या ‘बझबॉल’ अंतर्गत उल्लेखनीय कामगिरी करत आहे. त्यांनी ज्याप्रकारे पाकिस्तान दौऱ्यात फलंदाजी आणि गोलंदाजी केली, त्यावरून ते घरच्याच मैदानावर खेळल्याचा भास होत होता. त्याचबरोबर इंग्लंड पाकिस्तानला पाकिस्तानमध्ये कसोटी मालिकेत पराभूत करणारा पहिलाच संघ ठरला. यामुळे त्यांच्यासाठी कराची कसोटीचा विजय ऐतिहासिक ठरला. दुसरीकडे पाकिस्तानचा संघ मात्र निराशाजनक कामगिरी करत होता.
कराचीमध्ये पाकिस्तानने 23 कसोटी जिंकले आहेत, त्यामुळे ते त्या ठिकाणी सर्वाधिक कसोटी सामने जिंकणारे ठरले. तसेच इंग्लंड जेव्हापासून पाकिस्तानचा दौरा केला त्या 22 वर्षांच्या कालखंडात दुसऱ्यांदाच कराचीमध्ये कसोटी जिंकली आहे.
या मालिकेत पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम टिकाकरांचे लक्ष्य ठरला आहे. त्याच्यावर अनेक आजीमाजी पाकिस्तानी क्रिकेटपटूंनी धक्कादायक वक्तव्ये केली आहेत. या पराभवामुळे पाकिस्तान जवळपास आयसीसी कसोटी अजिंक्यपद 2021-23च्या अंतिम फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. Iceland Cricket Board tweet about Pakistan PAKvENG Third Test
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
ब्रेकिंग! भारताची डोकेदुखी वाढली, बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीतून रोहितबरोबर ‘हा’ गोलंदाज बाहेर
अरे, त्याची लायकी तरी आहे का? विराटशी त्याची तुलना नकोच म्हणत बाबरवर भडकला पाकिस्तानी दिग्गज