पाकिस्तान विरुद्ध इंग्लंड (PAKvENG) यांच्यात तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळली गेली. ज्यामध्ये यजमान पाकिस्तानला एकही सामना जिंकता आला नाही. कराचीमध्ये झालेल्या मालिकेतील शेवटच्या सामन्यात इंग्लंडने मंगळवारी (20 डिसेंबर) 8 विकेट्सने विजय मिळवला. या विजयामुळे पाकिस्तानने मात्र पहिल्यांदाच घरच्या मैदानावर कसोटी मालिका गमावण्याचा आणि इंग्लंडने पाकिस्तानला पाकिस्तानमध्ये कसोटीत पराभूत करण्याचा विक्रम रचला. यानंतर पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमवर मोठ्या प्रमाणात टिका होऊ लागला. एका पाकिस्तानी दिग्गजाने तर लोकांनी त्याची तुलना विराट कोहलीशी करूच नये, कारण तो त्या लायकीचाच नाही अशा कठोर शब्दांत सुनावले आहे.
बाबर आझम याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये उल्लेखनीय कामगिरी करत अनेक नवे विक्रम रचले तर काही जुने विक्रम मोडले. यामुळे त्याची तुलना चाहते नेहमीच भारताचा स्टार फलंदाजी विराट कोहली याच्याशी करू लागले. मात्र इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत त्याने ज्याप्रकारे निराशाजनक कामगिरी केली, त्यामुळे दानिश कनेरिया याने लोकांनी विराट आणि बाबरची तुलना करणे थांबवले पाहिजे असे मत व्यक्त केले आहे.
कनेरियाने त्याच्या युट्युब चॅनलवर बोलताना म्हटले, “सध्याच्या पाकिस्तानी फलंदाजी फळीत असा एकही खेळाडू नाही जे भारताच्या विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्यासारखे खेळू शकेल. पाकिस्तानच्या काही खेळांडूविषयी बोलताना चाहते त्यांना किंग हा सन्मान देतात, मात्र तेच खेळाडू निकाल चांगला देऊ शकत नाही. यामुळे लोकांनी विराट आणि बाबरची तुलना करणे सोडले पाहिजे.”
“बाबर हा कसोटी क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून शून्य आहे. त्याने इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स आणि मुख्य प्रशिक्षक ब्रेंडन मॅक्युलम यांंच्याकडून काहीतरी शिकले पाहिजे. तसेच बाबरने त्याचा गर्व बाजूला ठेवून सर्फराज अहमदला नेतृत्व कसे करावे हे विचारले पाहिजे,” असेही कनेरियाने पुढे म्हटले आहे.
या कसोटी मालिकेत बाबरने बॅटने उत्तम कामगिरी केली, मात्र नेतृत्वात तो कुठे ना कुठेतरी कमी पडला. कारण ज्या कराचीमध्ये पाकिस्तानने 23 कसोटी सामने जिंकले तेथे त्यांनी आता तिसऱ्यांदा पराभव पत्करला आणि घरच्या मैदानावर पहिल्यांदा कसोटी मालिका गमावली. या मालिकेत बाबरने 58च्या सरासरीने 348 धावा केल्या.
कराचीमध्ये झालेल्या मालिकेतील शेवटच्या सामन्यात इंग्लंडला जिंकण्यासाठी 167 धावा करायच्या होत्या. त्यासाठी बेन डकेट आणि झॅक क्राऊले यांनी उत्तम सुरूवात केली. डकेट 82 आणि स्टोक्स 35 धावा करत नाबाद राहिले. या मालिकेतील पहिले दोन्ही सामने इंग्लंडने 74 आणि 26 धावांनी जिंकत मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली होती. People should stop comparing Virat Kohli and Babar Azam said Danish Kaneria
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
धोनीच्या सहीशेजारी ऑटोग्राफ देण्यास ईशान किशनचा नकार, चाहत्याचा व्हिडीओ होतोय व्हायरल
काय रे हे? या तिघांना पूर्ण कारकिर्दीत दुहेरी धावसंख्या गाठताना आले नाकीनऊ






