पुर्वी क्रिकेटमध्ये डीआरएस ही संकल्पना नव्हती, तेव्हा गोलंदाज किंवा पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय असायचा. परंतु डीआरएस जेव्हापासून क्रिकेटमध्ये आला तेव्हापासून खेळाडूंना मदत मिळाली आहे. डीआरएस घेतल्यानंतर काही निर्णय पंचाच्या बाजूने जातात तर काही निर्णय हे खेळाडूंच्या बाजूने येतात. यावर आता माजी रणजी खेळाडू राजकुमार शर्माने (Rajkumar Sharma) प्रतिक्रीया दिली आहे. त्याच्या मते अनिल कुंबळेच्या (Anil Kumble) काळात डीआरएस ही संकल्पना असते. तर त्याने १००० हून अधिक विकेट्स पूर्ण केल्या असत्या.
अनिल कुंबळे हा भारतातील सर्वात यशस्वी गोलंदाजांपैकी एक आहे. त्याने त्याच्या कसोटी क्रिकेट कारकिर्दीत ६१९ विकेट्स पुर्ण केल्या आहेत. तो भारतातील सर्वाधिक विकेट घेणाऱ्या खेळाडूंच्या क्रमवारीत प्रथम क्रमांकावर आहे. हा खेळाडू त्याच्या गोलंदाजीने सर्व फलंदाजांना त्रासून सोडतो. काही वेळा पंचाचा निर्णय सुद्धा त्याच्या बाजूने नसायचा, त्यामुळे त्याला अपयश यायचे.
याबाबात आता राजकुमार शर्माने आपल्या युट्यूब पाॅडकास्टमध्ये म्हटले आहे की, सध्याच्या काळात डीआरएसचा फिरकी गोलंदाजांना मोठा फायदा झाला आहे.
ते म्हणाले, “डीआरएसचा फिरकी गोलंदाजांना मोठा फायदा झाला आहे. माझ्या काळात किंवा निखिलच्या काळात जर चेंडू गोलंदाजांच्या पॅडला लागला असेल, जो की फ्रंट फुटवर असायचा, तेव्हा पंच नेहमीच नाबाद द्यायचा. परंतु डीआरएसमुळे सगळ्या गोष्टी बदलल्या आहेत आणि अनिल कुंबळेंच्या वेळी डीआरएस असता, तर ते १००० हून अधिक विकेट्स घेऊ शकले असते.”