सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर मागच्या तीन आयपीएल हंगामांपासून मुंबई इंडियन्सच्या कॅम्पमध्ये होता. पण यावर्षी अखेर त्याला आयपीएल पदार्पणाची संधी मिळाली. आयपीएल कारकिर्दीची सुरुवातच्या सामन्यांमध्ये अर्जुनने चाहत्यांना प्रभावित केले आहे. सनरायझर्स हैदराबाद संघाविरुद्ध त्याने उत्कृष्ट गोलंदाजी केली आहे. युवराज सिंग याचे वडील योगराज सिंग यांनी दिलेले प्रशिक्षक अर्जुनच्या कामी आल्याचे पाहायला मिळाले आहे. अशातच आयपीएल पदार्पण झाल्यानंतर देखील योगराज सिंगकडून अर्जुंनला आपल्या गोलंदाजीतील कमी समजली आहे.
अर्जुनने तेंडुलकर (Arjun Tendulkar) मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील सामन्यादरम्यान आयपीएल पदार्पण केले. हंगामातील पहिल्या चार सामन्यांमध्ये अर्जुनला तीन विकेट्स मिळाल्या आहेत, ज्यासाठी योगराज सिंग (Yograj Singh) यांनी त्याचे कौतुक देखील केले. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ते म्हणाले की, “त्याच्या गोलंदाजीच्या ऍन्गलमध्ये थोडी कमी आहे. अर्जुनचा हात 45 डिग्रीवर आला आहे, जसा की जसप्रीत बुमराह आणि लसिथ मलिंगा यांचा येतो. ज्या दिवशी अर्जुन कानाजवळून गोलंदाजी करू लागेल, तेव्हा त्याची गती अजून वाढेल. तो 145 किमी ताशी गतीपेक्षा जास्त वेगाने चेंडू टाकू शकतो.”
योगराज सिंगच्या मते मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याने अर्जुनला तिसऱ्या क्रमांकावर किंवा डावाच्या सुरुवातीला खेळवले पाहिजे. मुलाकतीत ते पुढे म्हणाले की, “अर्जुन तेंडुलकरला क्रमांक तीन किंवा सलामीला आजमावले पाहिजे. त्याला खेळण्यासाठी 5 षटके दिली पाहिजेत. ज्यामुळे तो मोकळेपणाने खेळू शकेल. ज्या दिवशी त्याची बॅट चालेल, त्यादिवशी तो बादशाह बनेल आणि आपल्या वडिलांप्रमाणे राज्य करेल. त्याला नक्कीच संधी मिळाली पाहिजे, कारण तो गोलंदाजीसोबत फलंदाजीही चांगली करू शकतो.”
“मला युवराजने सांगितले होते की, सचिन सरचा फोन येत आहे. अर्जुनला चांगला सराव घ्यायला त्यांनी सांगितले होते. मी म्हणालो सचिन आणि युवारजनेही अर्जुनला प्रशिक्षण दिले पाहिजे. त्याला मार्गदर्शन केले, तर एक चांगला अष्टपैलू बनण्यापासून त्याला कोणीच रोखू शकत नाही. असे झाले नाही, तर क्रिकेटसाठी हे एक मोठे नुकसान असेल,” असेही योगराच सिंग पुढे म्हणाले. (If Arjun does not become an all-rounder, cricket will suffer a big loss, said Yograj Singh)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
आयर्लंडला क्लीन स्विप दिल्यानंतर श्रीलंकन संघाने रचला इतिहास, भारताचा 9 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडीत
‘तुझ्या लग्नात नाचायला येईल…’, स्वत: KKRच्या मालकाचे रिंकूला प्रॉमिस; व्हिडिओत फलंदाजाचा खुलासा