टी२० विश्वचषक स्पर्धेत कर्णधार बाबर आझमच्या नेतृत्वाखाली पाकिस्तान संघाची जोरदार वाटचाल सुरू आहे. बाबर आझमच्या नेतृत्व कौशल्याने सर्वांनाच प्रभावित केले आहे. जगातील महान फलंदाज बनण्याची क्षमता बाबर आझममध्ये दिसत आहे. अनेक माजी क्रिकेटपटू त्याच्या खेळाने प्रभावित झाले आहेत.
भारताचे माजी कर्णधार आणि महान फलंदाज सुनील गावसकर यांना त्याच्यामध्ये येणार्या काळातील महान फलंदाजाची झलक पाहायला मिळत आहे. गावसकर म्हणाले की, या खेळाडूने स्वत:ला तंदुरुस्त ठेवले तर कारकिर्दीच्या अखेरीस तो जगातील महान फलंदाजांपैकी एक होईल.
सुनील गावसकर यांनी बाबर आझमच्या शांत आणि प्रेरणादायी नेतृत्व कौशल्याचे कौतुक केले आहे. ७२ वर्षीय गावसकर यांनी एका लेखात पाकिस्तानच्या या कर्णधाराचे आणि त्याच्या संघावर स्तुतीसुमने उधळली आहेत. गावसकर यांनी लिहिले की, ‘यावेळी बाबर आझम ज्या प्रकारे पाकिस्तानचे कर्णधारपद सांभाळत आहे, त्यामुळे त्यांचा संघ शांत आणि खेळाबाबत जागरूक दिसत आहे. बाबरने स्वत:ला प्रेरित आणि तंदुरुस्त ठेवल्यास तो सर्वकालिन महान खेळाडूंपैकी एक होईल यात शंका नाही. तो ज्या पद्धतीने संघाचे नेतृत्व करत आहे, त्यामुळे तो पाकिस्तानचा महान कर्णधारही होऊ शकतो.
गावसकर पुढे म्हणाले, ‘बाबरची कर्णधारपदाची शैलीही चांगली आहे. तो आपल्या गोलंदाजांचा अतिशय हुशारीने वापर करतो. बाबर आपल्या विरोधी संघाच्या फलंदाजांची ताकद आणि कमकुवतपणा ओळखून आपल्या गोलंदाजांचा वापर करतो. तो सामन्याची परिस्थिती समजून घेण्यात पटाईत आहे आणि त्याने आतापर्यंत आजमावलेल्या गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणात तो १००% यशस्वी झाला आहे.
तत्पूर्वी, यूएईमध्ये खेळल्या जाणाऱ्या टी२० विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत पाकिस्तानचा संघ पोहोचला आहे. पाकिस्तान संघाने सुपर १२ फेरीमध्ये पाचही सामने जिंकून सर्वांना प्रभावित केले आहे. टी२० विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तान संघाने पहिल्यांदाच भारतीय संघावर मात केली होती. उपांत्य सामन्यात पाकिस्तान संघाची लढत ऑस्ट्रेलिया संघाशी होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
केवळ १३ आंतरराष्ट्रीय टी२० खेळण्याची मिळाली संधी, पण त्याने भारताला मिळवून दिले होते विश्वचषक जेतेपद
आयपीएस अधिकारी व्हायचे स्वप्न पाहणारा मुलगा बनला क्रिकेटपटू, वाचा संजू सॅमसनचा प्रेरणादायी प्रवास
तालिबानकडून ‘या’ माजी अष्टपैलू खेळाडूची अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाच्या अध्यक्षपदी वर्णी






