---Advertisement---

आयपीएस अधिकारी व्हायचे स्वप्न पाहणारा मुलगा बनला क्रिकेटपटू, वाचा संजू सॅमसनचा प्रेरणादायी प्रवास

On: गुरूवार, नोव्हेंबर 11, 2021 8:33 PM
---Advertisement---

यष्टिरक्षक फलंदाज संजू सॅमसन आज (११ नोव्हेंबर) वाढदिवस आहे. संजू आज आपला २७ वा वाढदिवस साजरा करत आहे. त्याचा जन्म ११ नोव्हेंबर १९९४ साली झाला. केरळच्या या क्रिकेटपटूने २०१५ मध्ये भारतीय संघासाठी पदार्पण केले होते आणि झिम्बाब्वेविरुद्ध पहिला टी२० सामना खेळला होता. संजूला क्रिकेटर बनायचे नव्हते, तर त्याला आयपीएस अधिकारी बनायचे होते, पण नशिबाला त्याला दुसरीकडे न्यायचे होते. त्याच्या यशात त्याच्या वडिलांचेही महत्त्वाचे योगदान होते. या खास प्रसंगी संजू सॅमसनबद्दल जाणून घेऊ या.

देशांतर्गत आणि आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या या खेळाडूला लहानपणी फुटबॉलची आवड होती. पण त्याला खेळात नाही, तर नागरी सेवांमध्ये जायचे होते आणि त्याला आयपीएस व्हायचे होते. संजू आपल्या कुटुंबासह दिल्लीत राहत होता आणि त्याचे वडील सुदर्शन सॅमसन दिल्ली पोलिसात काम करत होते आणि ते फुटबॉल खेळाडू होते. त्यांनी संजूला क्रिकेटचे प्रशिक्षण दिले. मुलगा दिल्लीत क्रिकेटमध्ये प्रगती करू शकणार नाही, असे वाटल्यावर त्यांनी त्याला केरळला नेले. तिथे शाळा-कॉलेज स्तरावर खेळताना संजूने खूप नाव कमावले.

सन २०१४ च्या आयपीएल दरम्यान संजू प्रसिद्धीच्या झोतात आला, जेव्हा त्याला राजस्थान संघाने तब्बल ४ कोटी रुपयांना विकत घेतले. संजू तेव्हा लिलावात करोडपती बनणारा सर्वात तरुण भारतीय क्रिकेटपटू होता. याआधी २०१३ मध्ये तो चॅम्पियन्स लीग टी-२० मध्ये दिसला होता. मुंबई इंडियन्सविरुद्ध पदार्पण करताना त्याने यष्टिरक्षक म्हणून सचिन तेंडुलकर, रोहित शर्मा आणि कायरन पोलार्डचे झेल घेतले. सामन्यात जेव्हा तो फलंदाजीला आला तेव्हा त्याने ४७ चेंडूत ५४ धावा केल्या.

आयपीएलमधील संजू सॅमसनच्या काही खास खेळ्या
सन २०१३ – राजस्थानसाठी दुसरा सामना खेळताना सॅमसनने रॉयल चॅलेंजर्स बंगलोरविरुद्धचा सामना जिंकण्यात मोलाची भूमिका बजावली, त्याने ४१ चेंडूत ६३ धावा केल्या. या सामन्यातील त्याच्या शानदार फलंदाजीमुळे त्याला सामनावीराचा किताबही मिळाला. आयपीएलमध्ये अर्धशतक ठोकणारा तो सर्वात तरुण खेळाडू ठरला होता.

सन २०१५ – या मोसमात सॅमसनने मुंबई इंडियन्सविरुद्ध नॉक-आऊट फेरीत ४६ चेंडूत ७६ धावा केल्या. मात्र, या सामन्यात राजस्थानला विजय मिळवता आला नाही आणि १८७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना त्यांना केवळ १७९ धावा करता आल्या.

सन २०१७ – दिल्ली कॅपिटल्सकडून खेळताना त्यानेपुणे सुपरजायंट्सविरुद्ध आयपीएलमध्ये शतक ठोकले. सॅमसनने आपल्या खेळीत ६३ चेंडूत १०२ धावा केल्या. दिल्लीने हा सामना ९७ धावांनी जिंकला आणि सॅमसनला त्याच्या या शानदार खेळीसाठी सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.

सन २०१८ – यावेळी संजूने राजस्थान संघात पुनरागमन केले आणि आरसीबी विरुद्ध ४५ चेंडूत ९२ धावांची खेळी खेळली ज्यात १० षटकारांचा समावेश होता. या सामन्यात राजस्थानने २१७ धावांची मोठी धावसंख्या उभारली होती आणि तो सामनावीर ठरला.

सन २०१९ – आयपीएल २०२० मध्ये संजूने केवळ ५५ चेंडूत १० चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने १०२ धावा केल्या. मात्र, सनरायझर्स हैदराबादविरुद्धचे त्याचे शतक कामी आले नाही आणि संघाला पराभव स्वीकारावा लागला.

महत्त्वाच्या बातम्या – 

तालिबानकडून ‘या’ माजी अष्टपैलू खेळाडूची अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाच्या अध्यक्षपदी वर्णी

दुसऱ्या उपांत्य सामन्यात नशीब आजमावणार पाकिस्तान-ऑस्ट्रेलिया? अशी असेल प्लेइंग इलेव्हन

जेव्हा शाहीन आफ्रिदीने लाईव्ह सामन्यात विराट, रोहित, केएल राहुलची उडवली होती खिल्ली, पाहा व्हिडिओ

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---