विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाला आयसीसी टी२० विश्वचषक २०२१ स्पर्धेत पराभवाचा सामना करावा लागला आहे. या स्पर्धेत पाकिस्तान आणि न्यूझीलंड विरुद्ध झालेल्या पराभवामुळे भारतीय संघाला उपांत्य फेरीत प्रवेश करता आला नव्हता. तसेच पहिल्याच सामन्यात भारतीय संघाला पाकिस्तान संघाकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. या पराभवामुळे भारतीय चाहते भलतेच चिडले आहेत.
दरम्यान, एका सामन्यातील एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. ज्यामध्ये पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदी रोहित शर्मा आणि विराट कोहलीची खिल्ली उडवताना दिसून येत आहे.
व्हायरल होत असलेला व्हिडिओ आयसीसी टी२० विश्वचषक २०२१ स्पर्धेच्या पाकिस्तानच्या एका सामन्यातील आहे. या व्हिडिओमध्ये शाहीन आफ्रिदी सीमारेषेवर क्षेत्ररक्षण करत आहे. त्यावेळी तो रोहित शर्मा, केएल राहुल आणि विराट कोहली बाद होण्याची नक्कल करत आहे.
सामना पाहण्यासाठी आलेले प्रेक्षक जेव्हा रोहित शर्माचे नाव घेत होते, त्यावेळी शाहीन आफ्रिदी रोहित शर्मा कशाप्रकारे बाद झाला होता याची नक्कल करताना दिसतोय. त्यानंतर जेव्हा प्रेक्षक विराट कोहली आणि केएल राहुलचे नाव घेत होते, त्यावेळी शाहीन आफ्रिदीने विराट कोहली आणि केएल राहुल बाद होण्याची देखील नक्कल केली. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतोय.
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारतीय संघाला १० गडी राखून पराभवाचा सामना करावा लागला होता. या विजयात शाहीन आफ्रिदीने मोलाचे योगदान दिले होते. त्याने ४ षटक गोलंदाजी करून ३१ धावा खर्च करून ३ गडी बाद केले होते. त्याने विराट कोहली, केएल राहुल आणि रोहित शर्मा या ३ मुख्य फलंदाजांना बाद केले होते.
https://twitter.com/crickohli18_/status/1457628908459896842?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1457628908459896842%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fwww.livehindustan.com%2Fcricket%2Fstory-shaheen-afridi-imitates-virat-kohli-rohit-sharma-and-kl-rahul-in-live-match-video-viral-5048469.html
या सामन्यात पाकिस्तान संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. तर प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाकडून कर्णधार विराट कोहलीने ५७ धावांची खेळी केली. तर रिषभ पंतने ३९ धावांचे बहुमूल्य योगदान दिले. या खेळीच्या जोरावर भारतीय संघाला २० षटक अखेर ७ बाद १५१ धावा करण्यात यश आले होते.
या धावांचा पाठलाग करताना पाकिस्तान संघाकडून मोहम्मद रिजवानने नाबाद ७९ आणि बाबर आजमने नाबाद ६८ धावा करत पाकिस्तान संघाला १० गडी राखून विजय मिळवून दिला.
महत्त्वाच्या बातम्या –
ज्या मुंबईतून क्रिकेटचे संस्कार झाले, त्याच मुंबई संघाचा ‘महागुरु’ बनलेल्या अमोल मुजुमदारचा प्रवास
अभय शर्मांना मागे टाकत ‘हे’ बनले भारताच्या क्षेत्ररक्षण प्रशिक्षकपदाचे प्रमुख दावेदार
इंग्लंड आणि न्यूझीलंडच्या खेळाडूंनी का बांधली दंडावर काळ्या रंगाची पट्टी? भारताशी होता संबंध