---Advertisement---

‘टी२०त चौकार-षटकार नव्हे अठकारही असावा, सुरुवात आयपीएलपासून व्हावी’, दिग्गजाचा अनोखा प्रस्ताव

On: बुधवार, सप्टेंबर 22, 2021 4:26 PM
Liam Livingstone
---Advertisement---

सध्या युएईमध्ये इंडियन प्रीमियर लीग २०२१ स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यातील सामन्यांना प्रारंभ झाला आहे. या स्पर्धेत रोज दमदार गोलंदाजी अन् क्षेत्ररक्षणाबरोबर फलंदाजाची चौफेर फटकेबाजीही पाहायला मिळत आहे. दरम्यान माजी भारतीय फलंदाज गौतम गंभीरने आयपीएल स्पर्धेच्या एका नियमात मोठा बदल करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. हा प्रस्ताव फलंदाजांच्या फटकेबाजीशी संबंधित आहे.

भारतीय संघाचा माजी कर्णधार गौतम गंभीर याने काही वर्षांपूर्वीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून आणि आयपीएल स्पर्धेतून निवृत्ती जाहीर केली आहे. सध्या तो आयपीएल स्पर्धेत समालोचकाची भूमिका पार पाडतोय. मंगळवारी (२१ सप्टेंबर) राजस्थान रॉयल्स विरुद्ध पंजाब किंग्स या दोन्ही संघांमध्ये रोमांचक सामना पार पडला. या सामन्यात दोन्ही संघातील फलंदाजांनी चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडला होता. हे पाहून गौतम गंभीरने, आयपीएल स्पर्धेत षटकार मारल्यानंतर ६ नव्हे तर ८ धावा मिळायला हव्यात, असा प्रस्ताव  आयोजकांसमोर मांडला आहे.

गंभीरने पंजाब किंग्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात झालेल्या सामन्यादरम्यान हा प्रस्ताव मांडला. ज्यावेळी त्याने हे वक्तव्य केले त्यावेळी, राजस्थान रॉयल्स संघाचा विस्फोटक फलंदाज लियाम लिविंगस्टन याने अर्शदीप सिंगच्या गोलंदाजीवर गगनचुंबी षटकार मारला होता.

गौतम गंभीरने जेव्हा हे वक्तव्य केले, त्यावेळी आकाश चोपडा देखील तेथे उपस्थित होता. त्यावेळी आकाश चोपडा देखील गंभीरच्या मुद्द्यावर सहमत होता. आकाश चोपडाने म्हटले की, “नक्कीच असे झाले पाहिजे. कारण ९० मीटरचा शॉट खेळण्यासाठी ताकद आणि शैलीची आवश्यकता असते. त्यामुळे फलंदाजाला याचा मोबदला मिळायला हवा.”

तसेच गंभीरने प्रतिसाद देत म्हटले की, “जर असे झाले तर, क्रिकेटमध्ये रोमांच आणखी वाढेल. तर कुठल्या संघाला शेवटच्या चेंडूवर ८ धावांची आवश्यकता असेल. तर तो संघ सामन्यात टिकून राहू शकतो. एखादया फलंदाजाने जर ९० मीटर किंवा त्यापेक्षाही लांब षटकार मारला तर तो अठकार देण्यात यावा. अशाप्रकारे फलंदाज आपल्या संघाला सामना जिंकून देऊ शकतो.”

महत्त्वाच्या बातम्या-

विजयाची नितांत गरज असलेल्या हैदराबादची दिल्लीपुढे अग्निपरिक्षा, पाहा उभयंतांची संभाव्य प्लेइंग इलेव्हन

रोमहर्षक विजयासह राजस्थानची सरशी, तर पंजाब खालून दुसऱ्या स्थानी; पाहा गुणतालिकेची सद्यस्थिती

विजयाच्या जल्लोषावर ‘विरजण’! पंजाबला धूळ चारल्यानंतर ‘या’ कारणामुळे संजूला १२ लाखांचा दंड

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---