भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी सध्या इंडियन प्रीमियर लीगमध्ये चेन्नई सुपर किंग्जसाठी खेळत आहे. हंगामातील आपल्या चौथ्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने मंगळवारी (12 एप्रिल) रोजी राजस्थान रॉयल्सविरुद्ध पराभव स्वीकारला. एमएस धोनी सध्या 41 वर्षांचा असला तरी त्याची फिटनेस जबरदस्त मानली जाते. मात्र, राजस्थानविरुद्धच्या सामन्यात त्याच्या दुखापतीच्या बातम्या समोर आल्या. अशात धोनीला दुखापत झाली, तर सीएसकेचे नेतृत्व कोण करणार हा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे.
आयपीएल 2023 मध्ये चेन्नई सुपर किंग्जचे खेळाडूंना एकापाठोपाठ दुखापती होत असल्याचे पाहायला मिळाले. राजस्थानविरुद्धच्या सामन्यात एमएस धोनी (MS Dhoni) जबरदस्त खेळला. धोनी खेळपट्टीवर असल्यामुळे सीएसकेच्या चाहत्यांना विजयाच्या आशा शेवटच्या चेंडूपर्यंत होत्या. पण 5 धावा आवश्यक अशताना धोनी षटकार मारू शकला नाही आणि राजस्थानने हा सामना जिंकला. सामना संपल्यानंतर धोनीला चालताना त्रास होत असल्याचेही समोर आले. सीएसकेचे मुख्य प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांनीदेखील धोनीच्या गुडघ्याला दुखापत झाल्याचे सांगितले.
धोनीव्यतिरिक्त इंग्लंडचा स्टार अष्टपैलू बेन स्टोक्स देखील दुखापतीचा सामना करत आहे. माहितीनुसार स्टोक्सला या दुखापतीतून सावरण्यासाठी पुढचे काही दिवस लागू शकतात. राजस्थानविरुद्धच्या सामन्यात सीएसकेचा वेगवान गोलंदाज सिसांडा गमाला यालाही दुखापत जाली आणि पुढेच्या दोन आठवड्यांसाठी विश्रांतीवर असेल. वेगवान गोलंदाज दीपक चाहल जवळपासून आयपीएल 2023 मधून बाहेरच झाला आहे. अशातच आता धोनीच्या दुखापतीची बातमी नक्कीच संघाची डोकेदुखी वाढवणारी आहे. सीएसकेला पुढचा सामना 17 एप्रिल रोजी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरविरुद्ध खेळायचा आहे. या सामन्यात संघाला नवीन कर्णधाराची गरज भासू शकते.धोनी जर पुढच्या सामन्यासाठी अनुपस्थित राहिला, तर सीएसकेची कमान कोण सांभाळणार? असा प्रश्न सध्या चाहत्यांना पडला आहे.
रविंद्र जडेजा
रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) धोनीच्या अनुपस्थितीत सीएसकेच्या कर्णधारपदासाठी पहिला दावेदार आहे. पण मागच्या वर्षी त्याने सुमार प्रदर्शनामुळे स्वतः सीसकेचे नेतृत्व सोडले होते. आयपीएल 2022 हंगाम सुरू होण्याआधी जडेजाने सीएसकेचे कर्णधारपद स्वीकारले. पण त्याच्या नेतृत्वात सीएसकेने चार सामने गमावले, तर एक सामना जिंकला. अशात जडेजा पुन्हा संघाचे कर्णधारपद स्वीकारेल, याची शक्यता फारच कमी आहे.
मोईन अली
इंग्लंडचा अष्टपैलू मोईन अली (Moeen Ali) मागच्या मोठ्या काळापासून सीएसकेसाठी खेळत आहे. मागच्या त्याच्या नेतृत्वात इंग्लंड संघाने पाकिस्तान दौरा केला. तब्बल 17 वर्षांनंतर पाकिस्तानमध्ये खेळताना मोईन अलीच्या नेतृत्वात इंग्लंडने यजमान पाकिस्तानला टी-20 मालिकेत 4-3 अशा फरकाने पराभूत केले. अशात सीएसकेच्या कर्णधारीच भूमिका देखील तो चोख पार पाडू शकतो.
ऋतुराज गायकवाड
सीएसकेचा सलामीवीर ऋतुराज गायकवाड (Rituraj Gaikwad) मागच्या काही आयपीएल हंगामांमध्ये चांगलाच चमकला आहे. आयपीएल 2021 मध्ये थ्याने हंगामात सर्वाधिक 635 धावा केल्या होत्या. देशांतर्गत क्रिकेटमध्ये महाराष्ट्र संघाचे नेतृत्व करणारा गायकवाड धोनीच्या अनुपस्थितीत सीएशकेची कमान देखील सांभाळू शकतो.
अजिंक्य रहाणे
सीएसकेकडे भारतीय संघाचा अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) देखील आहे. रहाणेचा सीएसकेसाठी हा पहिलाच हंगाम आहे पण त्याने संघासाठी चमकदार कामगिरीला सुरूवात देखील केली आहे. आयपीएलमध्ये त्याने यापूर्वी राजस्थान रॉयल्सचे नेतृत्व केले आहे. पण संघान नवीन असलेल्या रहाणेला सीएसकेच्या नेतृत्वाची संघी मिळेल, याविषयी शंका अधिक आहे. (If MS Dhoni is out, who will lead CSK? ‘These’ are the main contenders)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेपटून लग्नबंधनात, मोठ्या काळापासून रिलेशनमध्ये असलेल्या मैत्रिणीसोबत थाटला संसार
लसिथ मलिंगाचा सर्वात मोठा आयपीएल विक्रम उद्ध्वस्त! हंगामातील पहिल्याच सामन्यात रबाडाची मोठी कामगिरी