आयपीएल 2023 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाची कामगिरी संमिश्र झाली आहे. फाफ डू प्लेसिसच्या नेतृत्व खेळत असलेल्या आरसीबीने त्यांनी खेळलेल्या दहा पैकी पाच सामन्यात विजय मिळवला असून, पाच सामन्यात त्यांना पराभव पत्करावा लागला आहे. आयपीएलच्या सुरुवातीपासून संघात अनेक दिग्गज खेळाडूंचा समावेश असला तरी त्यांना एकही विजेतेपद पटकावता आले नाही. अशात आता पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू वसिम अक्रम यांनी एक महत्त्वपूर्ण विधान केले आहे.
आरसीबीला आयपीएल इतिहासातील सर्वात प्रसिद्ध संघांपैकी एक मानले जाते. मात्र, त्यांचा समावेश यशस्वी संघांमध्ये होत नाही. कारण पंधरा वर्षात त्यांनी एकदाही ही स्पर्धा जिंकली नाही. त्यांनी आत्तापर्यंत तीन वेळा स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. मात्र, तीनही वेळी त्यांच्या पदरी निराशाच पडली. असे असतानाच एका कार्यक्रमात वसिम अक्रम यांना एक प्रश्न विचारण्यात आला. एमएस धोनी आरसीबीचा कर्णधार असता तर काय झाले असते? त्यावर उत्तर देताना अक्रम म्हणाले,
“धोनी आरसीबीचा कर्णधार असता तर आरसीबीने आत्तापर्यंत तीन वेळा ही स्पर्धा जिंकली असती. आरसीबीला मोठ्या प्रमाणावर चाहत्यांचे समर्थन मिळते. जगातील सर्वोत्तम खेळाडू त्यांच्याकडे आहेत. धोनी त्या संघात असता तर नक्कीच ते विजेते झाले असते.”
धोनी हा आयपीएल इतिहासातील दुसरा सर्वात यशस्वी कर्णधार आहे. त्याने चेन्नई सुपर किंग्सला 2010, 2011, 2018 व 2021 असे चार वेळा विजेतेपद जिंकून दिले. या व्यतिरिक्त चेन्नई तब्बल 9 वेळा आयपीएलच्या अंतिम फेरीत सहभागी झाला आहे. या सर्व वेळी धोनी हाच चेन्नईचा कर्णधार राहिलाय.
(If Dhoni Play For RCB They Win Three Trophy Wasim Akram Said)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
नरेंद्र मोदी स्टेडियमवर शुबमनचा दरारा! आंतरराष्ट्रीय क्रिकेट असो नाहीतर आयपीएल, धावांचा पाडतोय पाऊस
रहाणेनंतर साहाला मिळणार का सेंकड चान्स? WTC फायनलआधी चर्चेला आला ऊत