सध्याचे बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली जेव्हा भारतीय संघाचे कर्णधार होते, तेव्हा नेहमीच संघातील खेळाडूंना त्यांनी पाठबळ देण्याचे काम केले. माजी दिग्गज फिरकी गोलंदाज हरभजन सिंगने गांगुलींशी संबंधित असाच एक किस्सा सांगितला आहे. साल २००१ मध्ये जेव्हा भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिका खेळत होता, तेव्हा गांगुलींनी हरभजनला संघात निवडले गेले होते. हरभजन गांगुलीच्या विश्वासास पात्र ठरला आणि भारताने मालिका जिंकली. हरभजनने खुलासा केला की, त्याच्यावर गांगुलीने विश्वास दाखवला नसता, तर त्याचे कर्णधारपद जाऊ शकत होते.
सौरव गांगुली (Sourav Ganguly) याच्यासाठी तो काळ कर्णधाराच्या रूपात काहीसा खडतर ठरत होता, पण ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिका जिंकल्यानंतर गोष्टी बदलल्या. हरभजन सिंग (Harbhajan Singh) याला संघात घेतल्यामुळे हे शक्य झाले. याच पार्श्वभूमीवर हरभजनला वाटते की, त्यावेळी जर गांगुलीने त्याचे समर्थन केले नसते, तर त्याचे कर्णधारपद धोक्यात आले असते.
एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत हरभजन म्हणाला की, “जर गांगुलीने माझे समर्थन केले नसते, तर त्यांना ती मालिका जिंकता आली नसती आणि त्याला कर्णधारपदावरून हटवले गेले असते. तो माझ्यासाठी देवाप्रमाणे धावून आला आणि माझा हात पकडला. मी देखील माझे काम करत राहिलो. यामुळे मला आणि त्याला दोघांनाही फायदा झाला आणि त्याला एक्सटेंशन मिळाले. त्याने मला संधी मिळण्यासाठी मदत केली, तरीदेखील हे खेळाडूवर अवलंबून असते की, त्याला संधीचा फायदा घेता येतो की नाही.”
यावेळी हरभजनने भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक ग्रेग चॅपलवर निशाणा साधला. हरभजनच्या मते चॅपलमुळे संघातील वातावरण गढूळ झाले. हरभजन म्हणाला की, “जर ग्रेग चॅपल भारताचे प्रशिक्षक नसते, तर आम्ही वेस्ट इंडीजमध्ये २००७ विश्वचषकात चांगले प्रदर्शन केले असते. जेव्हा तो तिथे होता, तेव्हा हा एक आनंदी संघ नव्हता. त्यामुळे त्याच्याशिवाय आम्ही निश्चितच चांगले प्रदर्शन केले असते.”
दरम्यान, हरभजन भारतीय संघाच्या इतिहासातील सर्वोत्तम फिरकी गोलंदाजांपैकी एक राहिला आहे. काही महिन्यांपूर्वी त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली, पण निवृत्ती घेताना हरभजन समाधानी नव्हता. त्याच्या मते त्याला भारतीय संघासोबत खेळण्याच्या अधिक संधी मिळाल्या पाहिजे होत्या.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
नशीब असावं तर असं! एकही आयपीएल सामना न खेळूनही ‘या’ ३ खेळाडूंनी कमावले कोट्यवधी
चीयरलीडरच्या ‘त्या’ आरोपामुळे आयपीएलची अब्रू चव्हाट्यावर आली
‘भारतात मला खूपच शाप दिले गेले, म्हणूनच…’ आयपीएल खेळलेल्या ऑस्ट्रेलियन खेळाडूचे धक्कादायक वक्तव्य