भारतीय संघाचे माजी खेळाडू आणि युवराज सिंगचे (Yuvraj Singh) वडील योगराज सिंह (Yograj singh) यांनी एक मोठं वक्तव्य केलं आहे. भारतीय संघाचा कसोटी कर्णधार म्हणून काल 24 मे रोजी गिलची निवड करण्यात आली आहे आणि याच विषयावर माजी क्रिकेटर यांनी त्यांचे मत व्यक्त केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, जर आज शुबमन गिल (Shubman gill) कर्णधार झाला आहे, तर याचे पूर्ण श्रेय युवराज सिंगला गेलं पाहिजे. माजी क्रिकेटर योगराज सिंग यांनी युवा कर्णधाराच्या संघर्षाच्या मागच्या लोकांचे कौतुक केले आहे.
एनआयशी बोलताना योगराज सिंग यांनी गिलच्या करिअरमध्ये मजबूत मार्गदर्शन आणि परिवाराच्या पाठिंब्याबद्दल भरभरून भाष्य केले. ते म्हणाले, जर शुबमन गिल आज कर्णधार झाला आहे आणि जर मोठ्या काळापर्यंत तो कर्णधार म्हणून टिकून राहिला, तर यामध्ये युवराज सिंगचे मार्गदर्शन महत्त्वाची भूमिका निभावेल आणि या आधी सुद्धा त्याने यामध्ये महत्त्वाची भूमिका आणि निभावली आहे.
योगराज सिंग यांनी युवराजच्या क्रिकेट संबंधी बुद्धिमत्तेचे कौतुक केले. गिल कर्णधार ठरला आहे तर यामागे युवराजची बुद्धी त्याची मेहनत राहिली आहे. गिलला एक खेळाडू आणि एक नेतृत्व करणाऱ्या लीडरच्या स्वरूपात विकसित होण्यासाठी मदत केली आहे. युवराजकडे दुनियातील सर्वात जास्त चांगला क्रिकेटिंग ब्रेन आहे. त्याने गिलला स्वतःच्या मार्गदर्शनाखाली तयार केले आहे. एक फलंदाज आणि एक कर्णधार म्हणून देखील युवीने त्याला खूप मदत केली आहे.
25 वर्षांचा गिल भारताचा पाचवा सर्वात युवा कसोटी कर्णधार आहे. मन्सूर अली खान पतौडी (21), सचिन तेंडुलकर (23), कपिल देव (24), रवी शास्त्री (25) या खेळाडूंनी देखील कमी वयात देशाचे नेतृत्व केले आहे. इंग्लंड विरुद्ध कसोटी मालिका 20 जूनपासून लीड्समध्ये सुरू होणार आहे.






