---Advertisement---

‘जडेजाचा काही उपयोग नाही’ माजी दिग्गजाने टी-२० विश्वचषकाविषयी केलीये भविष्यवाणी

On: रविवार, ऑगस्ट 14, 2022 5:18 PM
Virat-Kohli-Ravindra-Jadeja
---Advertisement---

आगामी आशिया चषक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. आशिया चषकासाठी निवडलेल्या भारताच्या १५ सदस्यीय संघात ४ फिरकी गोलंदाज आहे. युझवेंद्र चहल, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन आणि रवी बिश्नोई यांना या संघात निवडले गेले आहे. कुलदीप यादवला संधी मिळाली नाहीये, तर अक्षर पटेलला राखीव खेळाडूंमध्ये निवडले गेले आहे. ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात खेळल्या जाणाऱ्या टी-२० विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर ही संघ निवड महत्वाची आहे. भारताचा माजी सलामीवीर आकाश चोप्रा याने यासंदर्भात मोठी प्रतिक्रिया दिली आहे.

आकाश चोप्रा (Aakash Chopra) याच्या मते युझवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) संघाला जास्तीत जास्त विकेट्स मिळवून देऊ शकतो आणि तो आगामी टी-२० विश्वचषकाच्या संघात असला पाहिजे. चोप्रा स्वतःच्या यूट्यूब चॅनलवर बोलताना म्हणाला की, “चहलचे नाव मागच्या वर्षी टी-२० विश्वचषकात नव्हते. तुम्हा सर्वांप्रामाणेच मी देखील हैराण होतो. ही माझ्यासाठी आश्चर्याची गोष्ट होती. संघ नॉकआउट फेरीच्या आधीच बाहेर झाला होता. अशात यावर्षीच्या विश्वचषक चहल खेळला पाहिजे.” चहलने मागच्या वर्षीच्या टी-२० विश्वचषकानंतर टी-२० आंतरराष्ट्रीयमध्ये १३ सामने खेळले आणि यामध्ये १६ विकेट्स घेतल्या आहेत.

“आयपीएलमध्ये १७ सामन्यात त्याने २७ विकेट्स घेतल्या होत्या. यामध्ये एका हॅट्रिकचा समावेश होता. भारताकडे जो खरोकर विकेट्स घेणारे गोलंदाज आहेत, तो चहल आहे. तो म्हणाला की, जेव्हा तुम्हा स्पिनर्सला संधी देता, तेव्हा अनेकदा त्यांना विकेट्स घेण्यापेक्षा धावा रोखण्याची जबाबदारीही दिली जाते. कुलदीप यादवने मागच्या वर्षीच्या  टी-२० विश्वचषकानंतर फक्त दोन सामने खेळले आणि ३ विकेट्स घेतल्या. पण आयपीएलमध्ये त्याने १४ सामन्यांमध्ये २१ विकेट्स घेतल्या होत्या. तुम्ही जर विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या शोधात असाल, तर वेगवेगळ्या गोलंदाजांना आजमावले पाहिजे. जर रवी बिश्नोई आणि कुलदीप यांत्यात निवड करायची असेल, तर मी कुलदीपला संधी देईल,” असे आकाश चोप्रा पुढे बोलताना म्हणाला.

आकाश चोप्रा पुढे असेही म्हणाला की, अश्विन, जडेजा आणि अक्षर पटेलची आकडेवारीच सांगते की, ते अधिक विकेट्स घेऊ शकत नाहीत. म्हणजेच संघ विकेट्ससाठी त्यांच्यावर अवलंबून राहू शकत नाही. चोप्राच्या मते संघाला चहल, बिश्नोई आणि कुलदीप विकेट्स मिळवून देऊ शकतात.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्वाच्या बातम्या – 

Asia Cup 2022: रोहित करणार धोनीची बरोबरी! बाबरकडे आफ्रिदी आणि इंजमामला मागे टाकण्याची संधी

झिम्बाब्वेचा धुव्वा उडवायला पोहोचलाय भारतीय संघ! पाहा व्हिडिओ

ZIMvsIND: राहुलने गाजवलेलं झिम्बाब्वेविरुद्धच पदार्पण, आता कॅप्टन म्हणून मिळवणार पहिला विजय?

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---