भारत आणि इंग्लंड यांच्यातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेला सुरुवात झाली असून मालिकेच्या पहिल्या सामन्यात भारतीय संघाने इंग्लंड संघावर ६६ धावांनी विजय मिळवला आहे. कसोटी आणि टी20 मालिकेत इंग्लंडला पराभूत करणारा भारतीय संघ सध्या जोमात आहे. त्यामुळे भारतीय संघाला आता वनडे क्रमवारीत अव्वल क्रमांकावर येण्याची संधी आहे.
कसोटी आणि टी२० मालिका जिंकल्यानंतर भारतीय संघ वनडे मालिकेत इंग्लंडला हरवण्याच्या तयारीत आहे. या वनडे मालिकेत भारताने इंग्लंडला हरवले तर त्यांच्या क्रमवारीमध्ये बरीच सुधारणा होऊन भारताला वनडे मालिकेत अव्वल क्रमांकावर येण्याची संधी आहे.
…तर भारत येईल वनडे क्रमवारीत अव्वल क्रमांकावर
इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत भारताने विजयी संघाला ३-० ने हरवले तर आयसीसीच्या वनडे क्रमवारीत ते अव्वल स्थान गाठतील. सध्या इंग्लंडचा संघ १२३ रेटींग गुणांसह आयसीसी क्रमवारीमध्ये एक नंबरचा वनडे संघ आहे. तर दुसरीकडे, आयसीसी वनडे क्रमवारीत ११७ गुणांसह भारत दुसर्या क्रमांकावर आहे. तर न्यूझीलंड ११७ गुणांसह तिसऱ्या, ऑस्ट्रेलिया १११ गुणांसह चौथ्या आणि दक्षिण आफ्रिका १०८ गुणांसह पाचव्या स्थानावर आहे.
वनडेमध्ये सर्वोत्तम कामगिरी केल्यामुळे भारतीय संघ सातत्याने अव्वल ४ क्रमांकात कायम आहे. टीम इंडियाने शेवटी २०१८ सालामध्ये वनडे क्रमवारीत अव्वल स्थान मिळवले होते.
महत्त्वाच्या बातम्या-
-त्यावेळी किरण मोरेंनी पैश्यांना प्राधान्य दिले असते तर आज कृणाल-हार्दिक टीममध्ये दिसले नसते
-मिशेल स्टार्कने केला मोठा खुलासा; ‘या’ कारनामुळे घेतला आयपीएल २०२१ हंगामात न खेळण्याचा निर्णय






