मुंबई । पाकिस्तान क्रिकेट संघ सध्या इंग्लंडच्या दौर्यावर असून तेथे पुढील महिन्यात कसोटी आणि टी 20 मालिकेत भाग घेणार आहे. या क्रिकेट मालिकेपूर्वी पाकिस्तानच्या संघाला क्वारंटाईन करण्यात आले आहे. इंग्लंड क्रिकेट बोर्डाने जारी केलेल्या नियमांचे पालन करून पाकिस्तानी क्रिकेटपटू क्वारंटाईनचा कालावधी पूर्ण केल्यानंतर या मालिकेत भाग घेतील.
पाकिस्तानी क्रिकेटपटूंच्या अलग(क्वारंटीन) ठेवण्याबाबत या संघाचे माजी क्रिकेटपटू मुदस्सर नाझर म्हणतात की, ” जर 1990 च्या दशकातील पाकिस्तानी क्रिकेट संघाला सध्याच्या संघाप्रमाणे अलग ठेवण्यात आले असते तर ते आपापसात भांडत राहिले असते.”
मुदस्सर नजर पाकिस्तान नॅशनल अकॅडमी ऑफ पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (पीसीबी) प्रमुख राहिले आहेत. त्यांनी असा दावा केला आहे की, “इंग्लंडमध्ये कोरोना विषाणूच्या साथीला सामोरे जाण्यासाठी जैविक दृष्ट्या सुरक्षित वातावरण तयार केले आहे. जेथे क्रिकेटपटू राहतात तेथे राहून कंटाळले आहेत आणि त्यांना थकवा जाणवत आहे.”
एका पाकिस्तानी वाहिनीशी बोलताना मुदस्सर म्हणाले, “मला असे वाटत नाही की असे वातावरण क्रिकेटसाठी योग्य आहे. ते कोविड 19 साथीच्या आजारांमुळे घातलेल्या निर्बंधांमुळे इंग्लंडमधील खेळाडूही कंटाळले आहेत आणि थकवा जाणवत आहे हेही मी ऐकले आहे.”
मुदस्सर नजर म्हणाले की, 1990 च्या दशकातील पाकिस्तान क्रिकेट संघातील खेळाडूंनी अशाच कोरोना विषाणूच्या परिस्थितीत राहिले असते तर काय झाले असते याबद्दल मला आश्चर्य वाटते. ते म्हणाले की, ” मला असे वाटते की आता त्यातील काही खेळाडू भांडायला सुरुवात केली असती. एकमेकांशी मारामारी केली असती. या परिस्थितीत सध्याचे खेळाडू स्वत: ला सावरत आहेत आणि सर्व नियमांचे नीट पालन करत आहेत. विद्यमान खेळाडूंच्या धैर्याला सलाम करावे लागेल.”
वाचा- भारतीय संघाचं भविष्य अशी ओळख असलेल्या पृथ्वी शॉबद्दलची ही हटके माहिती