---Advertisement---

‘टीम इंडिया’ करणार पाकिस्तानच्या विजयाची प्रार्थना? ‘हे’ आहे कारण

On: शनिवार, मार्च 12, 2022 4:55 PM
---Advertisement---

भारत आणि श्रीलंका (INDvSL) यांच्यादरम्यान शनिवारपासून (१२ मार्च) कसोटी मालिकेतील दुसरा दिवस-रात्र कसोटी (Day-Night Test) सामना सुरू झाला. या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. या सामन्यात भारतीय संघ विजय मिळवून मालिका २-० अशी खिशात घालण्याचा प्रयत्न करेल. त्याच वेळी आपल्या विजयासह भारतीय संघ कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानच्या विजयाची देखील प्रार्थना करेल.

भारतीय संघ करणार पाकिस्तानच्या विजयाची प्रार्थना

सध्या भारत आणि श्रीलंकेव्यतिरिक्त पाकिस्तानात पाकिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया (PAKvAUS) ही कसोटी मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला कसोटी सामना अनिर्णीत राहिला होता. आता उर्वरित दोन कसोटी सामन्यांपैकी एका सामन्यात पाकिस्तानने विजय मिळवावा अशी, प्रार्थना भारतीय संघ करत असेल. कारण, भारतीय संघाने श्रीलंकेला पराभूत केल्यानंतर भारतीय संघ कसोटी क्रमवारीत अव्वलस्थानाच्या जवळ जाईल. त्याचवेळी ऑस्ट्रेलियन संघाने पाकिस्तान विरुद्ध विजय मिळविल्यास ते आपल्या पहिल्या स्थानी कायम राहतील.

असे आहे समीकरण

भारतीय संघाने श्रीलंकेविरुद्ध मालिका २-० अशी मालिका जिंकल्यानंतर भारतीय संघाचे ११८ रेटिंग गुण होतील. हे गुण ऑस्ट्रेलियन संघापेक्षा एका गुणाने कमी आहेत. पाकिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया मालिका अनिर्णीत राहिल्यास ऑस्ट्रेलियाला ४ गुणांचे नुकसान होईल व ते दुसऱ्या स्थानी घसरतील. ‌पाकिस्तान संघाने दोन पैकी एक सामना जिंकल्यानंतर ते १११ रेटिंग गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर येतील. मात्र, ऑस्ट्रेलियाने दोन्ही सामने जिंकल्यास ते १२१ गुणांसह आपले अव्वलस्थान मजबूत करतील.

दुसऱ्या कसोटीत भारताची खराब सुरुवात

बेंगलोर कसोटीत भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. या सामन्यात भारताची सुरुवात खराब झाली. भारताचे दोन्ही सलामीवीर काहीही विशेष कामगिरी न करता स्वस्तात बाद झाले. पहिल्या दिवशी दुसऱ्या सत्राचा खेळ सुरू असताना भारताने ५ बाद १४३ धावा केलेल्या. ‌

महत्वाच्या बातम्या-

Video: मुंबई इंडियन्सची नवी ‘आपली जर्सी’ पाहिली का? लई भारी दिसतेय (mahasports.in)

सहावी ओव्हर, सहावा चेंडू, रोहितचा षटकार अन् दर्शकाचं नाक; थेट रुग्णालयात करावं लागलं दाखल (mahasports.in)

Ind v SL : निर्णायक कसोटीत रोहितने टॉस जिंकला, प्रथम बॅटींगचा निर्णय; पाहा दोन्ही संघाची प्लेइंग इलेव्हन (mahasports.in)

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---