भारताचा मर्यादीत षटकांचा संघ सध्या श्रीलंका दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात भारत आणि श्रीलंका संघात ३ वनडे आणि ३ टी२० सामन्यांची मालिका होणार आहे. मात्र, ही मालिका सुरु होण्यापूर्वीच श्रीलंकेच्या संघात करोनाची २ प्रकरणे समोर आल्याने दौऱ्याचे वेळापत्रक बदलण्यात आले. त्यामुळे आता १३ जुलै ऐवजी १८ जुलैपासून या दौऱ्यातील सामन्यांना सुरुवात होईल. दरम्यान, या दौऱ्यात एक खास विक्रम होण्याची शक्यता आहे.
या दौऱ्यासाठी भारतीय संघात हार्दिक व कृणाल या पंड्या बंधूंची आणि राहुल व दीपक या चाहर बंधूंची निवड झाली आहे. त्यामुळे जर या चौघांनाही भारताच्या ११ जणांच्या संघात किमान एकातरी सामन्यात संधी मिळाली तर ८७ वर्षांनंतर असे होईल की भारताकडून भावांच्या २ जोड्या एकत्र खेळतील. यापूर्वी १९३४ साली इंग्लंड विरुद्ध चेन्नईमधील चेपॉक स्टेडियममध्ये झालेल्या सामन्यात सीके नायडू व सीएस नायडू आणि वजीर आली व नझिर आली या दोन भावांच्या जोड्या एकत्र खेळल्या होत्या.
श्रीलंका संघात कोरोनाचे संकट
श्रीलंका संघ नुकताच काहीदिवसांपूर्वी इंग्लंड दौऱ्यावरुन मायदेशात परतला. यादौऱ्यावरुन आल्यानंतर श्रीलंकेचे फलंदाजी प्रशिक्षक ग्रँट फ्लॉवर आणि कामगिरी विश्लेषक जीटी निरोशन हे कोरोना पॉझिटिव्ह आढळले. त्यामुळे संपूर्ण संघांचाच क्वारंटाईन कालावधी वाढवण्यात आला. त्याच कारणामुळे भारताविरुद्ध होणाऱ्या वनडे आणि टी२० मालिकाही काही दिवसांनी पुढे ढकलण्यात आल्या.
असा आहे श्रीलंका दौरा
या श्रीलंका दौऱ्यात ३ वनडे आणि ३ टी२० सामने खेळले जाणार आहे. या दौऱ्याला बदललेल्या वेळात्रकानुसार १८ जुलैपासून वनडे मालिकेने सुरुवात होईल. १८ जुलैनंतर २० आणि २३ जुलै रोजी अनुक्रमे दुसरा आणि तिसरा वनडे सामना खेळला जाईल. त्यानंतर २५ जुलैपासून टी२० मालिकेला सुरुवात होईल. टी२० मालिकेतील सामने अनुक्रमे २५, २७ आणि २९ जुलै रोजी खेळले जातील. वनडे आणि टी२० मालिकेतील सर्व सामने कोलंबो येथेच होणार आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
धोनी गुपचूप चण्याच्या गाड्यावर ठेवून आला तब्बल ३५ हजार रुपये, ‘हे’ होते कारण
वनडे क्रिकेटमधील बलाढ्य संघ समजल्या जाणाऱ्या ७ संघांच्या ‘या’ आहे कर्णधार-उपकर्णधारांच्या जोड्या
‘आपण २०३० विश्वचषक आयोजित करण्याच्या पात्रतेचे आहोत का? केविन पीटरसनचा संतप्त सवाल