भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा 2023 चा अंतिम सामना 7 जून रोजी खेळला जाणार आहे. लंडन येथील ओव्हल मैदानावर ही प्रतिष्ठेची लढत खेळली जाईल. या अंतिम लढतीसाठी भारतीय खेळाडू तीन टप्प्यात इंग्लंडला पोहोचले असून, भारतीय संघाचा सराव देखील सुरू आहे. असे असतानाच या अंतिम सामन्यावर पावसाचे ढग असल्याचे देखील सांगितले जातेय. या सामन्यात पावसाने व्यत्यय आणल्यास विजेता कशाप्रकारे ठरवला जाईल, याबाबत आपण जाणून घेऊया.
लंडन येथील ओव्हल मैदानावर होणाऱ्या या सामन्यात विजेतेपद पटकावण्याचा भारत आणि ऑस्ट्रेलिया दोन्ही संघांचा प्रयत्न असेल. मागील वेळी भारतीय संघ या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पराभूत झाला होता. तर, ऑस्ट्रेलियाला तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागलेले.
हा सामना 7 ते 11 जुन्या दरम्यान खेळला जाईल. या काळात इंग्लंडमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पहिले तीन दिवस पाऊस कमी प्रमाणात असेल. मात्र, पुढील दोन दिवस पावसाचा जोर वाढलेला असेल. अशा परिस्थितीत या सामन्यासाठी एक राखीव दिवस देखील ठेवण्यात आला आहे.
पावसामुळे पाच दिवसांचा खेळ पूर्ण न झाल्यास, तसेच दोन्ही संघांना निकाल अपेक्षित असल्यास राखीव दिवशी देखील खेळ होईल. राखीव दिवसाचा खेळ खेळायचा की नाही याबाबतचे सर्व अधिकार सामनाधिकार्यांकडे आहेत. मागील वेळी भारतीय संघाला न्यूझीलंडकडून अशाच राखीव दिवशी पराभूत व्हावे लागले होते.
पूर्ण खेळ होऊनही सामना अनिर्णीत राहिल्यास अथवा खेळ पूर्ण न झाल्यास दोन्ही संघांना संयुक्तपणे विजेतेपद देण्यात येईल. या स्पर्धेच्या विजेत्याला 13 कोटी रुपयांची रक्कम मिळणार आहे. मात्र संयुक्त विजेते होत असल्यास दोन्ही संघांना या रकमेचे समान वाटप होईल.
(If Rain Interrupted In INDvAUS WTC Final 2023 Then How Winner Declared)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या
IPL फायनलमधील धोनीचा ‘हा’ भावूक करणारा व्हिडिओ पाहून तुमचेही डोळे पाणावतील, जोरदार होतोय व्हायरल
WTC फायनलपूर्वीच कांगारुंना वाटतेय विराट-पुजाराची भीती! चेतावणी देत पाँटिंग म्हणाला, ‘लवकर विकेट…’