---Advertisement---

Semi Final 2: पावसामुळे SAvAUS सामना रद्द झाला, तर भारतासोबत कोणता संघ खेळणार Final? लगेच घ्या जाणून

SAvAUS
---Advertisement---

गुरुवारी (दि. 16 नोव्हेंबर) वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेतील दुसऱ्या उपांत्य सामन्यात दक्षिण आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघ आमने-सामने आहेत. हा सामना कोलकाता येथील ऐतिहासिक इडन गार्डन्सवर रंगला आहे. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बावुमा याने नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. मात्र, सामना सुरू असतानाच मोठी बातमी समोर येत आहे. पावसाच्या व्यत्ययामुळे सामना थांबवण्यात आला आहे. अशात जर सामना पावसामुळे रद्द झाला, तर कोणता संघ अंतिम सामन्यात भारतीय संघाचा सामना करेल? चला तर याविषयी जाणून घेऊयात…

पावसामुळे सामना रद्द झाला तर…
दक्षिण आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया (South Africa vs Australia) संघातील दुसरा उपांत्य सामना रद्द झाला, तर हा सामना शुक्रवारी (दि. 17 नोव्हेंबर) राखीव दिवशी खेळला जाईल. मात्र, जर हा सामना राखीव दिवशीही खेळला गेला नाही, तर काय असाही प्रश्न अनेक चाहत्यांना पडला असेल. अशात पॉईंट्स टेबलमध्ये ज्या संघाचा नेट रनरेट चांगला असेल, त्या संघाला अंतिम सामन्यात भारतीय संघाविरुद्ध खेळण्याची संधी मिळेल. दक्षिण आफ्रिकेचा नेट रनरेट +1.261 आहे, तर ऑस्ट्रेलियाचा नेट रनरेट +0.841 आहे. त्यामुळे हा सामना जर झाला नाही, तर दक्षिण आफ्रिका अंतिम सामन्यात भारताचा सामना करेल.

https://twitter.com/mufaddal_vohra/status/1725088659706368261

वेदर डॉट कॉमच्या रिपोर्टनुसार, या सामन्याच्या दिवशी पावसाची 70 टक्के शक्यता वर्तवली गेली होती आणि सामन्याच्या वेळी पाऊस पडलासुद्धा. यावेळी मैदान कव्हर्सने झाकले गेले होते. मात्र, आता पाऊस थांबला असून कव्हर्स काढले गेले आहेत. पावसामुळे खेळ थांबला, तेव्हा दक्षिण आफ्रिकेने धावफलकावर 14 षटकात 4 बाद 44 धावा लावल्या होत्या.

ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका संघाचा इतिहास खूपच रंजक राहिला आहे. 1999 विश्वचषक उपांत्य सामन्यातही उभय संघातील सामना बरोबरीत सुटला होता. मात्र, साखळी फेरीत ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेला पराभूत केले होते, ज्यामुळे ऑस्ट्रेलिया अंतिम सामन्यात पोहोचण्यात यशस्वी झाला होता. त्यासोबतच त्यांनी विश्वचषक किताबही आपल्या नावावर केला होता. (if rain interupt south africa vs australia match then which team qualify for cwc 2023 final know all scenario here)

हेही वाचा-
IND vs NZ Semi Final: जेव्हा सर्वांसाठी व्हिलन बनला होता शमी, बुमराहनेही लपवलेलं तोंड- Video
SA vs AUS Semi Final 2: रोहितसेनेशी Finalमध्ये भिडण्यासाठी कोलकात्यात रंगणार महायुद्ध, पाहा Playing XI

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---