---Advertisement---

याला म्हणतात नशीब! रोहित शर्माबद्दल घडलेला हा किस्सा पहाच

On: गुरूवार, डिसेंबर 27, 2018 3:26 PM
---Advertisement---

मेलबर्न। ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात सुरु असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात दुसऱ्या दिवसाखेर ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात बिनबाद 8 धावा केल्या आहेत. तसेच भारताने पहिला डाव 7 बाद 443 धावांवर घोषित केला आहे.

या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टिम पेन आणि भारताचा आक्रमक फलंदाज रोहित शर्मामधील मजेदार संवाद स्टंप माइकमधून ऐकायला मिळाला आहे.

झाले असे की भारताचा पहिला डाव सुरु असताना 139 व्या षटकादरम्यान अजिंक्य रहाणे आणि रोहित शर्मा फलंदाजी करत होते. त्याचवेळी रोहितचे लक्ष विचलित करण्यासाठी यष्टीरक्षक पेन यष्टीमागून सतत काहीतरी बोलत होता.

तसेच यावेळी पेन रोहितला म्हणाला, ‘मी राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यापैकी कोणाला पाठिंबा द्यावा याबाबत नेहमीच गोंधळलेला असतो. पण जर तू आज षटकार मारला तर मी मुंबईला पाठिंबा देईल.’

पहिल्यांदाच रोहितने केले असे- 

या सामन्याची शेवटची ७ षटके बाकी असताना भारतीय कर्णधार विराट कोहलीने संघाचा डाव घोषीत केला. विशेष म्हणजे रोहित शर्मा या सामन्यात ६३ धावांवर नाबाद राहिला. कसोटी कारकिर्दीत रोहितने १० अर्धशतके केली आहेत. परंतु पहिल्यांदाच कारकिर्दीत त्याने कसोटी अर्धशतकात षटकार मारला नाही आणि पेनचे मुंबईला पाठिंबा देण्याचे स्वप्न भंगले.

महत्त्वाच्या बातम्या:

तिसऱ्या कसोटीत टीम इंडियाचे ११ पैकी ६ खेळाडू आहेत त्रिशतकवीर

कसोटीत गोलंदाजाने केवळ १५ चेंडूत घेतल्या ६ विकेट्स

शतक तर पुजाराने केले परंतु ही गोष्ट करुन कायम नाव इतिहासात कोरले

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment