इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यात लीड्स येथे सुरू असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्याचा पहिला दिवस (२५ ऑगस्ट) पाहुण्यांसाठी अतिशय दुर्दैवी राहिला. नाणेफेक जिंकून भारताचा कर्णधार विराट कोहली याने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. परंतु इंग्लंडच्या गोलंदाजांनी त्याचा हा निर्णय चूकीचा ठरवत ७८ धावांवरच भारतीय संघाला गारद केले. दरम्यान भारताकडून सलामीवीर रोहित शर्मा याने सर्वाधिक १९ धावा केल्या. जर तो १९ धावांवर विकेट न गमावता अजून १ धाव काढून बाद झाला असता; तर भारतीय संघाच्या नावावर एका नकोशा विक्रमाची नोंद झाली नसती.
त्याचे झाले असे की, इंग्लंडच्या गोलंदाजांपुढे भारताचे फलंदाज एका एका धावेसाठी संघर्ष करताना दिसले. केवळ रोहितने सर्वाधिक १९ धावा केल्या. १०५ चेंडूंचा सामना करताना एका चौकाराच्या मदतीने त्याने या धावा केल्या. त्याच्याव्यतिरिक्त उपकर्णधार अजिंक्य रहाणेने ५४ चेंडूत ३ चौकारांच्या मदतीने सर्वाधिक १८ धावा जोडल्या. या दोघांव्यतिरिक्त एकही भारतीय फलंदाज साध्या २ आकडी धावाही करू शकला नाही.
सलामीवीर केएल राहुल, मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह खातेही न उघडता बाद झाले. ईशांत शर्माने ८ धावा, कर्णधार कोहलीने ७ धावा केल्या. राहिलेले खेळाडू ५ धावा करण्याच्या आपली विकेट गमावून बसले. परिणामी ४०.४ षटकात ७८ धावांवर भारताचा संपूर्ण संघ पव्हेलियनला परतला.
भारतीय कसोटी क्रिकेटच्या आजवरच्या इतिहासात पहिल्यांदाच संघातील कोणताही फलंदाज पहिल्या डावात २० धावांचा आकडाही गाठू शकलेला नाही. पहिल्या डावात सर्वाधिक १९ धावा करणाऱ्या रोहितने अजून एक धाव केली असती; तर हा नकोसा विक्रम भारताच्या खात्यात जमा झाला नसला.
This is the first time ever India had no player reaching 20 in the first innings of a Test match.#ENGvIND
— Kausthub Gudipati (@kaustats) August 25, 2021
दरम्यान इंग्लंडकडून अनुभवी वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन आणि क्रेग ओव्हरटनने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. तसेच ऑली रॉबिन्सन आणि सॅम करन यांनीही प्रत्येकी २ विकेट्स चटकावल्या.
भारताच्या ७८ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडच्या सलामीवीरांनी संघाला ४२ धावांची आघाडी मिळवून दिली आहे. रॉरी बर्न्सने नाबाद ५२ धावा आणि हसीब हमीदने नाबाद ६० धावा केल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
निंदनीय..! कोहली बाद होऊन मैदान सोडताना इंग्लंडच्या चाहत्यांनी हात दाखवत केलं ‘असं’ काही
भारत ७८ वर ऑल आऊट, चिंता नको! ही बातमी वाचून भारतीय चाहत्यांच्या जिवात जीव येईल






