भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा कसोटी सामना २५ ऑगस्टला सुरू झाला. सामन्याच्या पहिल्या दिवशी इंग्लंडने भारतीय संघाची वाईट अवस्था केली आहे. त्यांनी भारताचा सपूर्ण संघ केवळ ७८ धावांवर तंबूत माघारी पाठवला. ही मागच्या १२ महिन्यांतील दुसरी वेळ आहे, जेव्हा भारतीय संघ १०० धावांच्या आत सर्वबाद झाला आहे. याआधी डिसेंबरमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारतीय संघ ३६ धावांवर सर्वबाद झाला होता.
या डावात भारतीय संघासाठी सर्वात जास्त धाव करणारा खेळाडू रोहित शर्मा (१९ धावा) ठरला आहे. सामन्याच्या पहिल्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर रिषभ पंतने माध्यमांशी बोलताना त्याची प्रतिक्रिया दिली आहे.
“मला वाटते की प्रथम फलंदाजी करणे चुकिचा निर्णय होता. आम्ही एका संघाच्या रूपात निर्णय घेतो. हो, आम्ही स्वत:ला आणखी चांगले बनवू शकलो असतो. यामुळे एकदा आम्ही ३६ धावांवर सर्वबाद झालो होतो, हा विचार सतत डोक्यात फिरत राहतो. पण एक क्रिकेटपटूच्या रूपात मी अशाप्रकारे विचार करत नाही. तुम्हाला पहिल्यांदा तुमचा संघ पुढे ठेवायचा असतो आणि नंतर स्वत:ला. कधी-कधी जेव्हा पहिल्या फळीतले फलंदाज बाद होतात. तेव्हा तुम्हाला फलंदाजी करण्याची संधी मिळते. जर तुम्ही त्या स्थितीत चांगले प्रदर्शन कले तर तुमची खूप वाह-वाह होते. पण पुन्हा सांगू इच्छितो आम्ही आमच्या चुकांमधून शिकू आणि पुढे जाऊ,” असेही पंतने पुढे म्हटले.
महत्त्वाच्या बातम्या-
काय सांगताय? अवघ्या ६ चेंडूत भारताचे ४ गडी बाद, कोण होते ते शिलेदार; वाचा सविस्तर






