भारत आणि इंग्लंड यांच्यात कसोटी मालिकेतील तिसरा सामना खेळला जात आहे. या सामन्यादरम्यान इंग्लंडच्या प्रेक्षकांची वाईट वर्तवणूक पुन्हा एकदा पाहायला मिळाली आहे. सामन्यात इंग्लंडचा संघ फलंदाजी करत असताना भारतीय वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज सीमारेषेजवळ क्षेत्ररक्षण करत होता. क्षेत्ररक्षण करताना सिराजसोबत प्रेक्षकांनी चुकीचे वर्तन केले आहे. सिराजने या गोष्टीची तक्रार अंपायरकडे केली. जेव्हा कर्णधार विराट कोहलीला या गोष्टीची माहिती मिळाली, तेव्हा तो चिडलेला दिसला.
सामन्याच्या पहिल्याच दिवशी इंग्लंडने भारतीय संघाचा डाव ७८ धावांवर गुंडाळला. त्यानंतर भारतीय संघ गोलंदाजीसाठी मैदानात आला होता. भारतीय संघाची पहिल्याच दिवशी झालेली ही अवस्था पाहून इंग्लंडचे चाहते खूप आनंदी होते. इंग्लंडने सामन्याचा पहिला दिवस त्यांच्या नावे केला होता. यादरम्यान मैदानातील काही प्रेक्षकांचे भारतीय खेळाडूंसोबतचे वर्तन खूपच चुकीचे दिसले. मोहम्मद सिराज सीमारेषेजवळ क्षेत्ररक्षण करत असताना प्रेक्षकांनी त्याच्याकडे गुलाबी चेंडू (पिंक बाॅल) फेकला. त्यांच्या या गैरवर्तनानंतर सिराजने अंपायरकडे याची तक्रार केली.
सिराजने इंग्लंडच्या प्रेक्षकांच्या या वागणूकीचे चोख उत्तरही दिले. त्याने मैदानातील उत्साहात असलेल्या प्रेक्षकांना इशारा करत या गोष्टीची आठवण करून दिली की, भारतीय संघ मलिकेत १-० ने पुढे आहे आणि इंग्लंडचा संघ मागे आहे. त्याने याची तक्रार मैदानी अंपायरलाही केली होती. जेव्हा या सगळा गोष्टीची माहिती विराटला मिळाली, तेव्हा त्याने प्रेक्षकांमधून आलेल्या गुलाबी चेंडूला परत त्यांच्याकडे फेकण्यासाठी सांगितले. विराट सामन्यात प्रेक्षकांच्या या गैरवर्तनामुळे नाराज झालेला दिसला.
https://twitter.com/CricNeelabh/status/1430584981592567814?s=20
मालिकेतील तिसरा सामना २५ ऑगस्टला (बुधवारी) सुरू झाला आहे. सामन्याचा पहिल्या दिवशी इंग्लंडचे पारडे झुकलेले दिसले. इंग्लंडच्या गोलंदाजांनी भारतीय फलंदाजांना केवळ ७८ धावांत सर्वबाद केले आहे. मैदानात सध्या इंग्लंडचा संघ फलंदाजीसाठी आलेला आहे. पहिल्या दिवशीच्या खेळात रोहित शर्मा (१८ धावा) आणि अजिंक्य रहाणे (१७ धावा) या दोघांना वगळता एकही खेळाडू दोन आकडी धावसंख्या करू शकला नाही. मालिकेत भारतीय संघ १-० अशा आघाडीवर असून इंग्लंड त्यांची बरोबरी करण्याचा प्रयत्न करत आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
काय सांगताय? अवघ्या ६ चेंडूत भारताचे ४ गडी बाद, कोण होते ते शिलेदार; वाचा सविस्तर
विराटचा ७ धावांवर बाद होऊनही मोठा कारनामा; रहाणे, रोहितनंतर ‘ही’ कामगिरी करणारा तिसराच भारतीय
अँडरसन नडतोय कोहलीला! आत्तापर्यंत ‘इतक्यांदा’ बाद करत केली नॅथन लायनची बरोबरी





