हेडिंग्लेच्या मैदानावर इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्याची हेडिंग्ले मैदानावर लढत सुरू आहे. ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघाने १-० ची आघाडी घेतली आहे. त्यामुळे तिसऱ्या कसोटी सामन्यात देखील भारतीय संघ चांगली कामगिरी करणार अशी अपेक्षा होती. परंतु, इंग्लिश गोलंदाजांनी डावाच्या सुरुवातीपासूनच भारतीय फलंदाजांना बॅकफूटवर टाकले होते. दरम्यान, अवघ्या सहा चेंडूंमध्ये इंग्लिश गोलंदाजांनी चार भारतीय फलंदाजांना माघारी धाडले होते.
सहा चेंडूत चार भारतीय फलंदाज परतले माघारी
इंग्लंडच्या वेगवान गोलंदाजांनी सुरुवातीपासूनच भारतीय फलंदाजांना बॅकफूटवर टाकले होते. एकट्या रोहित शर्माने या डावात सर्वाधिक १९ धावांची खेळी केली. परंतु, रोहित शर्मा बाद झाल्यानंतर इंग्लिश गोलंदाजांनी एकापाठोपाठ एक तीन भारतीय फलंदाजांना माघारी धाडले.
तर झाले असे की, डावातील ३७ वे षटक टाकण्यासाठी ओवरटन गोलंदाजीला आला होता. या षटकातील चौथ्या चेंडूवर त्याने रोहित शर्माला बाद करत माघारी धाडले होते. त्यानंतर पुढच्याच चेंडूवर त्याने मागच्या सामन्यात अर्धशतक झळकावणाऱ्या मोहम्मद शमीचा काटा काढला.
त्यानंतर ३८ वे षटक टाकण्यासाठी सॅम करन गोलंदाजीला आला होता. त्याने या षटकातील दुसऱ्याच चेंडूवर रवींद्र जडेजाला पायचीत करत माघारी धाडले. त्यानंतर पुढच्याच चेंडूवर जसप्रीत बुमराहला बाद होऊन माघारी परतला होता. त्यामुळे भारताने केवळ ६ चेंडूत ४ विकेट्स गमावल्या. या ४ विकेटच्या आधीच भारताने ५ विकेट गमावल्या होत्या. त्यामुळे या ६ चेंडूत ४ विकेट गेल्याने भारताची अवस्था ९ बाद ६७ धावा अशी झाली होती. (Four Indian batsman got out in just four deliveries,watch video)
https://twitter.com/SonySportsIndia/status/1430533197247377412
भारतीय संघाचा डाव ७८ धावांवर संपुष्टात
या सामन्यात भारतीय कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु, इंग्लंडच्या वेगवान गोलंदाजांनी हा निर्णय पूर्णपणे चुकीचा ठरवला होता. संघातील मुख्य फलंदाज बाद झाल्यानंतर भारतीय संघाचा डाव पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळला. भारतीय फलंदाजांना पहिल्या डावात अवघ्या ७८ धावा करता आल्या.
या डावात रोहित शर्माने सर्वाधिक १९ तर अजिंक्य रहाणेने १८ धावांचे योगदान दिले. या दोघांव्यतिरिक्त अन्य कोणत्याही भारतीय खेळाडूला दोन आकडी धावसंख्या गाठता आली नाही. तर इंग्लंड संघाकडून जेम्स अँडरसन आणि ओवरटन यांनी प्रत्येकी ३ गडी बाद केले. तसेच सॅम करन आणि ऑली रॉबिन्सनने प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या.
महत्त्वाच्या बातम्या –
आरसीबीच्या ताफ्यात धाकड खेळाडूची एन्ट्री!! कामगिरी पाहून फुटेल घाम
विराटचा ७ धावांवर बाद होऊनही मोठा कारनामा; रहाणे, रोहितनंतर ‘ही’ कामगिरी करणारा तिसराच भारतीय
अँडरसन नडतोय कोहलीला! आत्तापर्यंत ‘इतक्यांदा’ बाद करत केली नॅथन लायनची बरोबरी






