इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातील ५ कसोटी सामन्यांची मालिका संपल्यानंतर इंडियन प्रीमियर लीग २०२१ स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात होणार आहे. ही स्पर्धा येत्या १९ सप्टेंबरपासून युएईमध्ये पार पडणार आहे. या स्पर्धेसाठी सर्वच संघ कसून मेहनत करत आहे. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांना या स्पर्धेत चौकार आणि षटकारांचा पाऊस पाहायला मिळू शकतो. दरम्यान, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघांत आणखी एका धाकड खेळाडूची एन्ट्री झाली आहे.
विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने आयपीएल २०२१ स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात अप्रतिम कामगिरी केली होती. तसेच दुसऱ्या टप्प्यात हा संघ आणखी मजबूत होऊन मैदानात उतरणार आहे. काही दिवसांपूर्वी या संघात वानिंदू हसरंगा, दुश्मंता चमिरा आणि टीम डेविड यांचा समावेश करण्यात आला होता.आता या संघात इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू जॉर्ज गार्टन याला संधी देण्यात आली आहे. ज्याची माहिती रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट शेअर करत दिली आहे.
यापूर्वी फिन ॲलेन, केन रिचर्डसन, ॲडम झांपा आणि स्कॉट कुगेलाईन या खेळाडूंनी आयपीएल स्पर्धेचा दुसरा टप्पा खेळण्यास नकार दिला आहे. त्यांच्याऐवजी पर्यायी खेळाडू म्हणून वानिंदू हसरंगा, दुश्मंता चमिरा आणि टीम डेविड यांना संधी देण्यात आली आहे. आता त्यात गार्टनचाही समावेश झाला आहे. २४ वर्षीय गार्टन याने नुकत्याच पार पडलेल्या द हंड्रेड क्रिकेट लीग स्पर्धेत विजेता साउदर्न ब्रेव संघाचे प्रतिनिधित्व केले होते. त्याने या स्पर्धेत गोलंदाजी करताना १० गडी बाद केले होते. (RCB signed England’s all rounder George Garton for second phase of IPL 2021)
जॉर्ज गार्टनची कारकीर्द
जॉर्ज गार्टनने आपल्या कारकीर्दीत एकूण ३८ टी -२० सामने खेळले आहेत. या दरम्यान त्याने ४४ गडी बाद केले आहेत. तसेच फलंदाजी करताना त्याने २०.७७ च्या सरासरीने १८७ धावा केल्या आहेत. तसेच २३ प्रथम श्रेणी सामन्यात त्याने ५३ गडी बाद केले आहेत. तसेच फलंदाजी करताना त्याने २०.८४ च्या सरासरीने ५४२ धावा केल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
विराटचा ७ धावांवर बाद होऊनही मोठा कारनामा; रहाणे, रोहितनंतर ‘ही’ कामगिरी करणारा तिसराच भारतीय
अँडरसन नडतोय कोहलीला! आत्तापर्यंत ‘इतक्यांदा’ बाद करत केली नॅथन लायनची बरोबरी
टीम इंडियावर २१ व्या शतकात दुसऱ्यांदा ओढवली ‘ही’ नामुष्की; नकोशा विक्रमाच्या यादीत पाकिस्तान अव्वल




