---Advertisement---

विराटचा ७ धावांवर बाद होऊनही मोठा कारनामा; रहाणे, रोहितनंतर ‘ही’ कामगिरी करणारा तिसराच भारतीय

On: गुरूवार, ऑगस्ट 26, 2021 3:03 AM
---Advertisement---

इंग्लंड विरुद्ध भारत या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील तिसरा कसोटी सामना हेडींग्लेच्या मैदानावर सुरू आहे. या सामन्यातील पहिल्या डावात विराट कोहली मोठी खेळी खेळण्यास अपयशी ठरला असला, तरीदेखील त्याने मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे.

ही मालिका विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची आहे. कारण ही या स्पर्धेच्या दुसऱ्या पर्वातील पहिलीच मालिका आहे. या मालिकेत भारतीय संघाने अप्रतिम कामगिरी करत १-० ची आघाडी घेतली आहे. परंतु, विराट कोहलीला अजूनही मोठी खेळी साकारता आली नाहीये. तो अजूनही फलंदाजीमध्ये संघर्ष करताना दिसून येत आहे.

तिसऱ्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात देखील तो अवघ्या ७ धावा करत माघारी परतला आहे. पण, तरी देखील त्याने मोठा विक्रम केला आहे. तो विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत सर्वात कमी डावात १ हजार धावा पूर्ण करणारा तिसरा भारतीय फलंदाज ठरला आहे.

विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचे दुसरे पर्व सुरू आहे. या पर्वातील पहिल्याच मालिकेत विराट कोहलीने स्पर्धेत १००० धावांचा पल्ला गाठला आहे. विराटने विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत १००० धावा करण्याचा पराक्रम २८ डावांत केला आहे.

तसेच रोहित शर्मा या स्पर्धेत सर्वात जलद १००० धावा करणारा भारतीय फलंदाज आहे. त्याने हा कारनामा १७ डावात केला होता. तसेच दुसऱ्या स्थानी अजिंक्य रहाणे आहे. रहाणेने हा कारनामा २५ डावात केला होता. या स्पर्धेत सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम जो रूटच्या नावे आहे. त्याने या स्पर्धेतील २३ सामन्यात २०४६ धावा केल्या आहेत. (Virat Kohli becomes the third Indian Batsman to score thousand runs in wtc)

विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारे फलंदाज (२५ ऑगस्टपर्यंत)
२०४६ – जो रुट (२२ सामने)
१६७५ – मार्नस लॅब्यूशेन (१३ सामने)
१३४१ – स्टिव्ह स्मिथ (१३ सामने)
१३३४ – बेन स्टोक्स (१७ सामने)
१२६५ – रोहित शर्मा (१५ सामने)
१२४४ – अजिंक्य रहाणे (२१ सामने)
११२५ – बाबर आझम (१२ सामने)
१०२८ – जोस बटरल (२१ सामने)
१००३ – विराट कोहली (१८ सामने)

पहिल्या पर्वात भारतीय संघ उपविजेता
विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या पहिल्या पर्वात भारतीय संघाने अंतिम फेरीत धडक दिली होती. या सामन्यात भारतीय संघाला विजयाचे प्रबळ दावेदार मानले जात होते. परंतु, न्यूझीलंड संघाने भारतीय संघाला ८ गडी राखून पराभूत केले होते. यासह पहिले कसोटी विश्वविजेतेपद मिळवले होते. भारत उपविजेता ठरला होता.

महत्त्वाच्या बातम्या – 

अँडरसन नडतोय कोहलीला! आत्तापर्यंत ‘इतक्यांदा’ बाद करत केली नॅथन लायनची बरोबरी

टीम इंडियावर २१ व्या शतकात दुसऱ्यांदा ओढवली ‘ही’ नामुष्की; नकोशा विक्रमाच्या यादीत पाकिस्तान अव्वल

वेट प्लेट्सवर बॅलन्स करत श्रेयस अय्यरचे अनोखे पुशअप्स, रणवीर सिंगही व्हिडिओ पाहून चकित

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---