---Advertisement---

झहिर म्हणतो, ‘असे’ जर झाले तर भारताला २५ रिव्ह्यू घ्यावे लागलीत

On: सोमवार, डिसेंबर 28, 2020 8:54 PM
---Advertisement---

भारत आणि ऑस्ट्रेलिया संघादरम्यान ऐतिहासिक मेलबर्न क्रिकेट ग्राउंड येथे ४ सामन्यांच्या मालिकेतील दुसरा कसोटी सामना सुरू आहे. कर्णधार अजिंक्य रहाणेच्या शानदार शतकी खेळीमुळे भारतीय संघ सामन्यात आघाडीवर आहे. तिसऱ्या दिवशीच्या पहिल्या सत्रात ऑस्ट्रेलियन संघाने भारताच्या उर्वरित ५ विकेट लवकर बाद केल्या. त्यानंतर दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियन संघ मैदानात उतरला असता एक मजेशीर प्रसंग घडला.

सिराजने वेड विरुद्ध कर्णधार अजिंक्य रहाणेला डीआरएस घेण्याची मागणी केली. हा डीआरएस पूर्णतः अयशस्वी ठरल्यामुळे समालोचन करत असलेला भारताचा माजी वेगवान गोलंदाज झहीर खानने सिराजबद्दल मजेशीर रित्या भाष्य केले आहे.

सिराज गोलंदाजी करण्यासाठी आला तेव्हा ऑस्ट्रेलियन संघाची धावसंख्या २ बाद ४८ धावा अशी झाली होती. यादरम्यान सिराजच्या चेंडूवर मॅथ्यू वेड पूर्णतः चुकला व चेंडू थेट त्याच्या पॅडला लागला. यावेळी सिराजने मोठ्याने अपील केले. पण पंचांनी नाबाद दिल्याने त्याने शेवटी कर्णधार अजिंक्यला डीआरएस घेण्यास भाग पाडले.

मात्र डीआरएसमध्ये स्पष्ट झाले की चेंडू हा पूर्णतः लेग स्टंपच्या बाहेर आहे. या वेळी समालोचन करत असताना मोहम्मद कैफ झहीरला म्हणाला की, गोलंदाज आपल्या पहिल्या सामन्यात जास्तच उत्साहीत असतात का? यावर झहीर खान म्हणाला,’सिराज जितका उत्साही आहे, असाच जर पुढे राहिला तर भारताला कमीत कमी 25 रिव्ह्यू घ्यावे लागतील.’ यानंतर झहीरने स्पष्ट केले की तो हे विनोदाने म्हणत आहे.

रिव्ह्यूबद्दल रिषभ पंतने योग्य मार्गदर्शन करावे, असे झहीर खानचे मत आहे. झहीर म्हणाला, ‘यष्टीरक्षकाला चेंडू कुठे पडला व कुठे जात आहे, याचे पूर्ण ज्ञान असते. अशा परिस्थितीत रिषभने कर्णधार अजिंक्यला रिव्यू घेण्यात मदत करावी.’

महत्त्वाच्या बातम्या –

हिम्मत असावी तर अशी! पाय फ्रॅक्चर झाला असूनही ‘या’ दिग्गजाने केली गोलंदाजी, सर्वत्र होतंय कौतुक

अरर..! फाफ डू प्लेसिस १९९ धावांवर बाद; पाहा ‘अशी’ गेली विकेट

आयसीसी पुरस्कारांवर वर्चस्व गाजवणारी एलिसा पेरी म्हणाली, ‘इतरही उत्तम महिला टी20 खेळाडू आहेत, पण…’

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---