भारतीय संघ सध्या चांगली कामगिरी करत आहे. भारतीय क्रिकेट संघाने गेल्या काही वर्षात ऐतिहासिक विजय देखील मिळवले आहेत. मात्र, असे असले तरी, भारतीय संघाला गेल्या अनेक वर्षांपासून आयसीसी स्पर्धांचे विजेतेपद मिळवण्यात अपयश येत आहे. त्यामुळे 1983 मध्ये कसे यशस्वी झालो, हे दिग्गज माझी क्रिकेटर सुनील गावस्कर यांनी सांगितले आणि भारतीय संघाला विश्वचषक जिंकण्यासाठी महत्वाची सूचना दिली.
महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली 2013 मध्ये भारताने अखेरची आयसीसी स्पर्धा जिंकली होती. त्यावेळी चॅम्पियन ट्रॉफी जिंकली होता. त्यानंतर भारतीय संघ आयसीसीची एकही स्पर्धा जिंकू शकला नाही.
माजी कर्णधार आणि भारताचे दिग्गज स्टार क्रिकेटर सुनील गावसकर यांनी आगामी विश्वचषकासाठी भारतीय संघाला एक महत्वाची सूचना दिली आहे. त्यासाठी त्यांनी 1983 च्या विश्वचषकाचे उदाहरण दिले आहे. आगामी टी20 विश्वचषक आणि 50 षटकांचां विश्वचषक जिंकायचा असेल, तर संघात किमान दोन मुख्य अष्टपैलू खेळाडूंची गरज भासेल, असे गावसकर म्हणतात.
गावस्कर यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राच्या स्तंभात म्हटले होते, “14 खेळाडू आणि व्यवस्थापक असलेले एक पथक होते, ज्याने आम्ही आश्चर्यकारक कामगिरी केली. त्यावेळी क्षेत्ररक्षणाचे कोणतेही बंधन नव्हते, तसेच षटकात टाकलेल्या बाउंसर चेंडूच्या संख्येवर कोणतेही बंधन नव्हते, लाल चेंडू वापरला जात होता, जो इंग्लिश परिस्थितीत जुना होऊनही फिरणे थांबत नव्हता. तो संघ अष्टपैलू खेळाडूंनी भरलेला होता. मर्यादित षटकांच्या क्रिकेट संघाच्या यशाची हीच गुरुकिल्ली होती.”
अधिक वाचा – ‘गुरुजीं’ना संघ निवडीत हवाय मोठा बदल; कर्णधार, प्रशिक्षकांना विशेष अधिकार देण्याची केलीय मागणी
सुनील गावस्कर म्हणाले, “2007 टी20 विश्वचषक आणि 2011 सालचा 50 षटकांच्या विश्वचषक स्पर्धेतही भारताकडे असे खेळाडू होते जे फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही विभागात योगदान देऊ शकत होते. त्यामुळे जर भारताला दोन चांगले अष्टपैलू खेळाडू सापडले,तर 2022 मध्ये ऑस्ट्रेलियातील टी 20 विश्वचषक आणि त्यानंतर 2023 मध्ये 50 षटकांचां विश्वचषक जिंकण्याची आपल्याकडे चांगली संधी आहे.”
भारतीय संघ सध्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर असून, तिथे त्यांना ३ कसोटी सामन्यांची आणि ३ वनडे सामन्यांची मालिका खेळायची आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
भारताच्या १९ वर्षांखालील संघाच्या हरनुरला मिळालाय क्रिकेटचा वारसा; अजोबा, वडील, काका देखील क्रिकेटर
नाद करायचा नाय! कोहली अँड कंपनीने सेंच्यूरियन कसोटी जिंकत रचलाय मोठा इतिहास
व्हिडिओ पाहा – आख्खी कारकिर्द संपली, पण पठ्ठे कधीही शून्यावर बाद झाले नाहीत