---Advertisement---

‘भारत-पाक सामना नाही झाला तर…’, माजी पाकिस्तानी दिग्गजाचे मोठे विधान

On: बुधवार, नोव्हेंबर 30, 2022 12:16 AM
ramiz raja anuraj thakur
---Advertisement---

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना पाहाण्यासाठी चाहत्यांमध्ये नेहमीच अधिकची उत्सुकता पाहायला मिळाली आहे. असे असले तरी, मागच्या काही दिवसांमध्ये दोन्ही संघांच्या क्रिकेट बोर्डांमधील मतभेद समोर आले आहेत. बीसीसीआय सचिव जय शहांच्या एका वक्तव्यावरून सुरू झालेला हा वाद अद्याप मिटला नाहीये. आता या वादात पाकिस्तानचा माजी कर्णधार सलमान बट याने देखील स्वतःचे मत मांडले आहेत. 

बीसीसीआय सचिव जय शहा (Jay Shah) यांनी आशियाई क्रिकेट परिषदेच्या अध्यक्षपदी नियुक्त झाल्यानंतर एक मोठे वक्तव्य केले होते. शहांनी म्हटल्याप्रमाणे भारतीय संघ 2023 मध्ये आशिया चषक स्पर्धेसाठा पाकिस्तानमध्ये जाणार नाही. शहांच्या या वक्तव्यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डचे अध्यक्ष रमीझ राजा (Ramiz Raja) यांच्याकडूनही जोरदार प्रत्युत्तर मिळाली. रमीझ राजांच्या मते भारत आशिया चषकासाठी पाकिस्तानमध्ये येणार नसेल, तर पाकिस्तान देखील पुढच्या वर्षी विश्वचषकासाठी भारतात जाणार नाही.

रमीझ राजांनी घेतलेली ही भूमिका भारताचे केंद्रिय क्रीडा मंत्री अनुराग ठाकुर (Anurag Thakur) यांना चांगलीच लागली. ठाकुर यांनी समीझला आठवण करून दिली की भारत एक असा संघ आहे, ज्याला कोणत्याच देशाकडून दुर्लक्षीत केला जाऊ शकत नाही. समीझ राजा आणि अनुराग ठाकुर यांच्यातील हा वाद चांगलाच पेटला. अशातच आता माजी पाकिस्तानी कर्णधार सलमान बट (Salman Butt) यांनी स्वतःची भूमिका मांडली आहे. सलमान बटच्या मते भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना चाहत्यांना पाहायला आवडतो. तसेच जर हा सामना खेळवला गेला नाही, तर समाजातील अनेक घटकांना यामुळे नुकसान होणार आहे.

सलमान बट म्हणाला की, “या विषयीवर आपण काय बोलू शकतो? एक पाकिस्तान क्रिकेट बोर्डचे प्रमुख आहेत, तर दुसरे भारताचे क्रीडा मंत्री आहेत. पण काही लोकं याच गोष्टीचा उपयोग पोडियमसाराखा करून घेतात आणि त्यावर उभे राहतात. राजकीय बाजू नेहमी असतेच, पण प्रमुख मुद्दा क्रिकेटमध्ये सुधारणा हाच आहे.”

“रमीझ राजा बरोबर आहेत. जे लोक पाकिस्तान क्रिकेटला फॉलो करतात आणि संघाचे चाहते आहेत, जर पाकिस्तान संघ खेळला नाही, तर त्यांची उत्सुकता कमी होईल. भारत आणि पाकिस्तान सामना झाला नाही, तर पैसे कमावणाऱ्या अनेकांचे नुकसान होईल. लोकांना खरोखर भारत पाकिस्तान सामना पाहायचा आहे. भारताने पाकिस्तानमध्ये आणि पाकिस्तान भारतात खेळण्यासाठी गेला पाहिजे, असे त्यांना वाटते. दोन्ही देशांतील संबंध सुधारले पाहिजेत,” असे सलमान पुढे बोलताना म्हणाला.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
ऋतुराजच्या मनाचा मोठेपणा! म्हणाला, “माझे द्विशतक संपूर्ण महाराष्ट्राला अर्पण करतो”
‘बास करा माझी इंग्रजी इथेच संपली’, पाकिस्तानी खेळाडूकडून पत्रकार परिषदेत स्पष्ट उत्तर 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---