---Advertisement---

‘तर भारताला कोणीही पराभूत करु शकणार नाही’, अक्षर पटेलने सांगितले कारण

On: मंगळवार, जून 1, 2021 5:22 PM
---Advertisement---

भारतीय संघ 2 जूनला इंग्लंड दौऱ्यासाठी रवाना होणार आहे. या दौऱ्यात भारतीय संघ आयसीसीद्वारे आयोजित विश्वकसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात खेळणार आहे. हा सामना इंग्लंडमधील साऊथॅम्पटन येथील मैदानावर होणार आहे. त्यानंतर भारत यजमान इंग्लंड विरुद्ध 5 कसोटी सामन्याची मालिका खेळणार आहे. भारतीय संघ या दौऱ्यासाठी कंबर कसून तयारी करत आहे.

इंग्लंड विरुद्ध भारताने मायदेशात खेळलेल्या कसोटी मालिके फिरकी गोलंदाज अक्षर पटेलने उत्कृष्ट प्रदर्शन केले होते. आता त्याने अगामी इंग्लंड दौऱ्याबद्दलही प्रतिक्रिया दिली आहे. त्याची या इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघात निवड झाली आहे.

एका न्यूज चॅनलला मुलाखत देत असताना अक्षर म्हणाला की, ‘जेव्हा सामने भारतामध्ये होत असतील तर फिरकीपटू आक्रमक भूमिका बजवतात. परंतु जेव्हा इंग्लंड किंवा ऑस्ट्रेलियामध्ये फिरकी गोलंदाजीसाठी पोषक असे मैदानं नाहीत. तेव्हा संघात एखादा चांगला फिरकीपटू असण्याची खूप गरज असते. हे फिरकीपटू जेव्हा वेगवान गोलंदाजांना विश्रांतीची गरज असेल तेव्हा गोलंदाजी करु शकतात. ते प्रतिस्पर्धी संघाला अधिक धावा घेण्यापासून रोखू शकतात.’

भारतीय संघाचा इंग्लंडमध्ये 3 महिन्यांचा मुक्काम आहे. या दौऱ्यात भारत 18 ते 22 जून दरम्यान न्युझीलंड विरुद्ध विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना खेळणार आहे. त्यानंतर भारत आणि इंग्लंडमध्ये 5 कसोटी सामन्यांची मालिका होणार आहे.

अक्षरने सांगितले की, ‘इंग्लंडमधील वातावरण वेगवान गोलंदाजांसाठी पोषक आहे. परंतु, एका फिरकीपटूने आपली भूमिका ओळखून संघाचे प्रतिनिधित्व केले पाहिजे. आता सध्या आपल्या संघातील फिरकीपटूही उत्कृष्ट फलंदाजी करताना दिसून येत आहेत. जर 8 व्या आणि 9 व्या स्थानवरील खेळाडू जर उत्तम फलंदाजी करतील तर भारतीय संघाला कोणीही हरवणार नाही.”

महत्त्वाच्या बातम्या –

पंजाब किंग्जचा ‘हा’ खेळाडू अडकला विवाहबंधनात, खास कॅप्शन देत शेअर केले फोटो

न्यूझीलंडला कमी समजणे भारताला पडू शकते महागात, ‘या’ भारतीय दिग्गजाने दिला इशारा

खुलासा! धावांचा रतीब घालणाऱ्या रोहितने ‘या’ खेळाडूच्या बॅटने झळकावले होते पहिले अर्धशतक

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---